चंद्रपूर - शहरातील वादग्रस्त व जीवघेणा उड्डाणपूल म्हणजेच आताचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, नामकरण होण्याआधी या पुलावर नागरिकांच्या मृत्यूचे अर्धशतक झाले, नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या दबावतंत्राने पुन्हा पुलाचे काम सुरू झाले होते. Warora naka
मात्र ढिसाळ नियोजनामुळे पुलाला पूर्णत्वास यायला अनेक वर्षे लागले, पूल तयार झाला मात्र पुलाच्या मध्ये रस्त्यावर लावण्यात आलेल्या लोखंडी प्लेट उखडल्याने मोठा अपघात होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. Balasaheb thackeray over bridge
पूल नागरिकांसाठी सुरू झाल्यावर उड्डाणपुल खड्डेमय झाला यावर प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे, साधं लक्षही या उड्डाणपुलावर देत नसून मोठी दुर्घटना घडल्यास प्रशासन जागे होणार का अशी चर्चा आता जोर पकडत आहे.
लोखंडी रेल्वे सायडिंग प्लेट उखडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना खबरदारी घ्यावी लागत आहे. Chandrapur pwd
उड्डाणपूलाच्या खाली रेल्वे ट्रॅक असल्यास रेल्वे सायडिंग च्या लोखंडी प्लेट पुलावर लावण्यात येतात, सदर प्लेट्स रेल्वे ट्रॅक ची विशेष खूण दर्शविते.
मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना दुर्घटनेच्या रुपात बसणार हे मात्र यावरून निश्चितचं!