News 34 chandrapur (गुरू गुरनुले) मूल : दोन दुकानांना लागलेल्या आगीत विज वितरण कंपनीने शार्ट सर्किटची शक्यता नाकारली असून समाज माध्यमावर प्रसारीत झालेल्या त्या चलचित्रामूळे सदर प्रकरण संशयाच्या भोव-यात सापडले आहे. दरम्यान सदर प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याने घडलेले आग प्रकरण पोलीसांसमोर आव्हाण ठरले आहे.
Fire case
सोमनाथ मार्गावरील त्रिमुर्ती प्रॉपर्टी डिलर्सच्या मालकीच्या इमारती मध्यें असलेल्या विलन विला कापड दुकान आणि लक्ष्मी ब्युटी कलेक्शन Beauty Collection या दोन दुकानांना २८ मे रोजी १.३० वाजताचे सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि नगर प्रशासनाने जनतेच्या सहकार्याने आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले, परंतू यंत्रणा येईपर्यंत दोन्ही दुकानातील लाखो रूपये किंम्मतीचे साहित्य जळुन खाक झाले. दुकानांना लागलेली आग शार्ट सर्किटमूळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात असतांना घटनेच्या दिवशी सकाळीच दुकानासमोरील मार्गावर सापडलेले शर्ट आणि पॅन्ट, लगतच्या दुकानामधून मिळालेले घटनेच्या काही वेळापूर्वी तीन व्यक्ती आगग्रस्थ दुकानामधुन बाहेर निघत असतांनाचा सीसीटिव्ही फुटेज आणि घटनेच्या दोन दिवसापूर्वी एका विक्रेत्याने काढलेला दुकानाचा २५ लाखाचा विमा insurance शहरवासीयांमध्यें चर्चेचा झाल्याने घडलेले आग प्रकरण सशंयाच्या वादात सापडले आहे. दरम्यान शहरवासियांमध्यें होत असलेल्या चर्चेचा धागा पकडत लक्ष्मी ब्युटी कलेक्शन दुकानाचे मालक विषवजीत उड्डाण आणि त्यांच्या नातेतेवाईकांनी सदर प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली असून घडलेल्या आगीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अशी मागणी केली आहे. लागलेल्या आगीत दुकान मालकासह इमारत मालकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे असतांना इमारत मालक काहीही तक्रार न करता बघ्याची भूमिका घेत असल्याने सदर आगीच्या प्रकरणात संशयाचा वास येऊ लागला आहे. मुल शहरात रंगलेली चर्चा व उड्डाण यांनी केलेल्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसानी तपास संशयाच्या दिशेने चालविला आहे. वीज वितरण कँपणीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शॉर्ट सर्किटच्या short circuit आगीची शक्यता नाकारली आहे. तरीसुद्धा वीज वितरण कँपणीच्या वरिष्ठ अधिकृत विभागाकडुन अहवाल प्राप्त झाल्यानंतर चौकशीची खरी दिशा ठरणार आहे.सदर प्रकरणी ज्याचे भोवती संशयाची सुई फिरत आहे त्या व्यक्ती विषयी शहरात उलट-सुलट चर्चा केली जात असल्याने आगीच्या प्रकरणाची खरी वास्तविकता उजेडात आणून विधवनसक अपप्रवृत्तीला आळा घालावा अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
