News 34 chandrapur
राजुरा - राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक 25 मे रोजी सकाळच्या दरम्यान रुग्णालयातील मुदतबाह्य औषधांचा साठा हा अनधिकृतपणे अत्यंत चुकीच्या पद्धतीने रुग्णालय परिसरातील शौचालयाच्या टाक्याचे चेंबर जेसीपीच्या साह्याने फोडून त्यात तो मुदतबाह्य औषधांच्या साठ्याची विल्हेवाट लावण्याचा किळसवाणा प्रयत्न करणाऱ्या रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात राजुरा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष देरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून अनाधिकृतपणे मुदतबाह्य औषधांच्या विल्हेवाट लावण्याचा किळसवाणा प्रकार करणारे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व औषधी निर्माता (फार्मासिस्ट) यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे आता या प्रकरनात राज्याचे आरोग्य मंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Expiry date of medicine
त्यामुळे आता या प्रकरनात राज्याचे आरोग्य मंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Expiry date of medicine
प्राप्त माहितीनुसार या पूर्वीही रुग्णालयातील मुदतबाह्य औषधाचा साठ्याची विल्हेवाट ही शासणाच्या निर्देशानुसार न लावता अत्यंत चुकीच्या व बेजबाबदार पद्धतीने लावण्यात येत असल्याचेही संतोष देरकर यांनी सांगितले. शासनाच्या निर्देशांची पायमल्ली करीत आपल्या पदाचा गैरवापर करून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व औषध निर्माता फार्मासिस्ट हे अनाधिकृतपणे व अत्यंत घृणास्पद पद्धतीने मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावत असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे निवेदन संतोष देरकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे. मुदत बाह्य औषध्यांची विल्हेवाट कशी लावावी याची एक विशिष्ट पद्धत व नियमावली असताना रुग्णालय परिसरातील एका शौचालयाच्या टाक्याचे चेंबर जेसीपी ने फोडून त्यात या मुदतबाह्य औषध्छांचा साठ्याची विल्हेवाट लावत असताना संतोष देरकर यांनी रंगेहात पकडले. यावेळी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने ती मुदत बाह्य औषधाच्या पिशव्या त्या टाक्यातून बाहेर काढून सदर प्रकार लपविन्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रुग्णालयात आजपर्यंत मुदत बाह्य औषध कुठं व कश्यापद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया संतोष देरकर यांनी दिली. Expire medicine
संतोष देरकर, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी, राजुरा
उपजिल्हा रुग्णालय येथील मुदतबाह्य औषध्छांचा साठा अनाधिकृतपणे अत्यंत बेजबाबदारपणे रुग्णालय परिसरातील शौचालयाच्या टाक्याचे चेंबर जेसीबीने फोडून त्या मुदतबाह्य औषधांच्या साठ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून होत होता. ही बाब माहिती होताच घटनास्थळाला भेट दिली असता रुग्णालयातील सुरक्षारक्षकाने तो मुदत बाह्य औषधसाठ्याच्या प्लास्टिक पिशव्या टाक्यातून बाहेर काढल्या. या प्रकरणाची योग्यरित्या उच्चस्तरीय चौकशी होऊन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व औषध निर्माता फार्मासिस्ट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे Health Minister rajesh tope यांना केली आहे.

