News 34 chandrapur गुरू गुरनुले
मूल - न. प. चे सार्वजनिक नाल्याच्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केल्याने पावसाळ्यात आलेला पाणी जाण्याचा मार्ग असल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे नुकसान होत होते. शिवाय रस्त्यावरही पाणी साचत असल्याने ये-जा करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबतच्या अनेक तक्रारी नगर प्रशासनाला प्राप्त झाल्या.
Chandrapur news today तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासक महादेव खेडकर, प्रभारी मुख्याधिकारी मनीषा वजाडे यांनी वास्तविक परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा रामपूर तुकूम परिसरातील स. नं. ९९ व ९२ मधील अनेक प्लॉटधारकांनी नाल्याच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे दिसून आली. आले. याशिवाय दुर्गा मंदिर जवळून गेलेल्या डी. पी. रोडवरही अनेकांनी पक्के अतिक्रमण केल्याने पाणी वाहून जाणारी मोठी नाली बुजून दिसेनाशी झाली होती. encroachment meaning in marathi

पाणी जाण्यासाठी मार्गच नाही, अशा परिस्थितीत नाल्यावरील अतिक्रमण काढणे गरजेचे असल्याने नगर परिषद प्रशासनाने मोकळ्या जागेवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेत
नाल्याच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून न जाता नागरिकांच्या घरात जात होते. याबाबत नगर प्रशासनाकडे तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने नगर प्रशासनाने पाहणी करून नियमानुसार अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली.
मोहिमेअंतर्गत अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंती आणि घराचा काही भाग पाडण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.
परंतु, असंख्य समस्याग्रस्त नागरिकांच्या हितासाठी बोटावर मोजण्या इतक्या नागरिकांचे अतिक्रमण काढणे योग्य समजून प्रशासक महादेव खेडकर आणि मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम यशस्वी केली. मोहिमेदरम्यान नायब तहसीलदार नंदकिशोर कुमरे, बांधकाम विभागाचे कर्मचारी राजू पुद्दटवार यांच्यासह पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.