News 34 chandrapur
चंद्रपूर : विदर्भ प्रांतातून विविध जिल्ह्यांमधून हजारो ओबीसी बांधव दिल्ली येथील ओबीसी महाअधिवेशनाला जाणार असल्याचे नियोजन बैठकीच्या माध्यमातून विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले. Vidarbha obc
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२२ ला न्यू दिल्ली येथील तालकटोरा इंडोर स्टेडियम येथे आयोजित केले आहे.
या महाअधिवेशनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसीं महासंघाच्यावतीने सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा घेण्यात आली. Obc category list
या अधिवेशनाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षते खाली व समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांचे उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन आज (दि. १९) ला दुपारी १ वाजता श्री. लीला सभागृह, जनता शिक्षण महाविद्यालयात येथे करण्यात आले होते. Obc cast list in maharashtra
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, उपाध्यक्ष डॉ. सुधाकर जाधव, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रदीप वादाफळे युवा अध्यक्ष सुभाष घाटे, सहसचिव शरद वानखेडे, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, गुणेश्वर आरिकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरथ, युवा अध्यक्ष चेतन शिंदे, मनोज चव्हाण, महिला महासंघाचे सुषमा भड, रेखा बाराहाते, कल्पना मानकर, कर्मचारी महिला महासंघाच्या रजनी मोरे, विध्यार्थी संघटनेचे रोशन कुंभलकर आदी उपस्थित होते.
डॉ. बबन तायवाडे यांनी ओबीसी समाजाची दशा व दिशा यावर यथोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सचिन राजूरकर यांनी केले.
संचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार प्रदर्शन रजनी मोरे यांनी केले. यावेळी विदर्भातून मोठ्या संख्येत ओबीसी बांधव बैठकीला उपस्थित झाले.