News 34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 17 जून ला वर्ग 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. 10th resultsनिकाल १७ जून २०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी १ नंतर उपलब्ध होतील, अशी माहिती विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. Maharashtra ssc result
या संकेतस्थळावर बघा निकाल
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे बोर्डाने म्हटलंय.
