News 34 chandrapur
चंद्रपूर - दिवस उन्हाळयाचे असले व त्यातही विदर्भ असेल व जर वीज गेली तर डोक्याचा पारा वाढल्याशीवाय राहात नाही. मग येतो पावसाळा जोराचा पाऊस झाला की वीज जाते. ती का जाते?
सर्वदूर पसरलेल्या व ऊन, वारा, पावसाचा मार खाणारी वीजयंत्रणा सर्वत्र उघडीच असते व ती यंत्रणादेखिल अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बाधित होते. उन्हाळयात अनेकदा अचानक भार वाढल्याने तसेच वादळ, वारा, गारपिट, पूर, झाडयाच्या फांदया, पतंगीच्या मांजामुळे, व चिनी बनावटीच्या धातुचा अंश असलेल्या पतंगीमुळे, पक्षांमुळे व हो साप वीजवाहिण्यांवर चढल्यामुळेसुध्दा वीजपुरवठा खंडीत होत असतो. अनेक ठिकाणी अवैधपणे शिकारीसाठी ११ किव्हो वाहिन्यांचा वापर केला जातो. अशा वेळेस शिकार तारांच्या संपर्कात येवूनही ट्रीपींगमुळे वीजपुरवठा खंडीत होत असतो. Msedcl work
वीज पुरवठा खंडित झाला की जीव कासावीस होतो व ते साहाजिक आहे. विदर्भातील गर्मीत वीजेशिवाय जगणे खरेच कठीण आहे. परंतु वीज जाते व वीजपुरवठा खंडित होतो व ग्राहकांना त्रास होतो हेही सत्य आहे. ती दुरुस्त करण्यास लाईनमन नावाचा माणूस केव्हाच धजावलेला असतो. Lineman
वीज का गेली? का जाते? परत आली तर त्यामागे वीजकंपनीच्या लाईनमेनला त्याचा जीव मुठीत काम करावे लागले असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधणेही आवश्यक असते. जर रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात येत असेल तर कोणीतरी लाईनमेन त्या पावसात किंवा अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलवर चढलेला असतो. रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच, वीजखांब पडणे, तारा तुटने अशा अपवादात्मक परिस्थतीत परत येते. विजवितरण प्रणाली अशी आहे की ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या प्रणालीत जिवाला धोका असतो. त्यामुळेच एखादया परिसरातील वीजपुरवठा रात्री़च्या वेळी खंडीत झाल्यास तो दुरूस्त करण्यासाठी लाईनमन आपल्या सोबत्यासोबत निघतो. Work in progress
राज्याच्या / देशाच्या कानाकोपऱ्यात तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आनणे कठीण काम.लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होवून त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी-कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात. तर कधी हा बिघाड गाव किंवा काही भागापुरताही मर्यादित असतो.
वीज खांबात वीज पुरवठा उतरू नये यासाठी चिनीमातीचे इन्सुलेटर (चिमणी) खांबावर बसविले जातात. बहुधा हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात. ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. अन् लागलीच आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होवून फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. जर हा फिडर बंद पडला नाही तर जिवित अथवा वित्त हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रेकरची व्यवस्था केलेली असते.
जेंव्हा-केंव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. ऊन्ह वाऱ्याची, पावसाची किंवा अंधाराची पर्वा, जंगली श्वापद यांची पर्वा न करता करता किलोमीटर्सचे पॅट्रोलींग केल्यानंतर बिघाड सापडत असतो. चंद्रपूर गडचिरोली सारख्या ठिकाणी, जंगलातून वाहिनी गेली असेल अडचणी दुपटीने वाढतात. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात. वाघ अस्वलांचा सामना तर जंगली भागात काम करणाऱ्या लाईनमन साठी नेहमीचे.
वीज गेल्यास शांतपणे विचार केल्यास वीजकर्मचारी आपल्यासाठी कसा जीव धोक्यात घालत वीजपुरवठा सुरू करण्यात लागला असतो.
आपल्या घरात ई एल सी बी, एम सी बी असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जिवितहानी टाळता येईल.
१ अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.
२ वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून, किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.
३ वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
४ विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.
५ विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारु नयेत.
६ वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा. सोबतच फक्त आपलाच वीजपुरवठा बंद आहे कि आजूबाजचा सुध्दा हेही तपासून बघावे. सर्व परिसारातील वीजपुरवठा खंडीत झाला असेल तर उपकेंद्रातील यंत्रात नोंदविल्या जाते व वीजपुरवठा पुर्ववत करण्यास लाईनमेन तेव्हाच रवाना होतात.
७ बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा, जेणेकरुन तातडीने दुरूस्ती करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल.
८ विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी.
९ विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १८००-२३३-३३४५, १८००-१०२-३३४५, किंवा १९१२०, १९१२ या टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे.
मध्यवर्ती सर्व ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. या क्रमांकावर पहिल्यांदा कॉल करताना ग्राहकांना त्यांचा १० अंकी ग्राहक क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवावा लागतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा ग्राहक क्रमांक विचारला जात नाही.
चंद्रपूर मंडळातील चंद्रपूर, बल्लारशा व वरोरा विभाग व त्यांतर्गत तालुके, गावातील ग्राहक ७८७५७६११९५ व गडचिरोली मंडळातील आलापल्ली, गडचिरोली व ब्रम्हपुरी विभाग व त्यांतर्गत तालुके व गावातील ग्राहक ७८७५००९३३८ या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधू शकतील.
