News 34 chandrapur
चंद्रपूर : जनता करिअर लॉन्चरने बारावीत यशाची उत्तम परंपरा राखली आहे. यानुसार याही वर्षी जनता करिअर लॉन्चरने १००% निकाल देवून यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे. Maharashtra state board
नुकतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या सत्र २०२१-२२ च्या निकालात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जिवतोडे, विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य सौ. के.ए. रंगारी, डॉ. आशीष महातळे, डॉ. के. सी. पाटील, प्रा. व्ही.एस. बोढाले, प्रा. लीलाधर खंगार, प्रा. नितीन कुकडे, डॉ. माया धमगाये आदी उपस्थित होते. Janta career launcher chandrapur
यावेळी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेतून कु. रिया मांढरे (९३.३३%), राज खनके (९३.३३%), अमेय भलमे (९२.३३%), कु. डोलीया मानकनी (९२.३३%), अजय सोनी (९२.१७%), शिव पोटकर (९०.५०%), अथर्व वासाडे (९०.१७%), प्रतीक्षा बिसने (९०%), रीद्दी रंगारी, जानवी ठीकरे, शुभम निकूरे, रीना काकडे, इशिका जुमडे, दीप्ती भगत, प्रणित बुरांडे, रोझी मेश्राम, प्रवीण गौरकार, सौरभ जेणेकर, संकेत पडोळे, सोमनाथ कदम, गौरव काकडे, तनु वासेकर, अमिषा हेपट, हर्ष टोंगे, अनिकेत कडू, रुची रंगारी, सेजल नैताम, प्रेरणा सातपुते, चेतना भोयर, सई मुत्तावार, अतुल पराचाके कला शाखेतून विनीत पिदुरकर (७८%), कु. निकिता घोडके (६६.३३%), कु. सुप्रिया पाचभाई (६६.३३%), वाणिज्य शाखेतून यश पुराणिक (८९.५०%), कस्तुरी जिराफे (८४.१७%), प्राची मुके (८४%), एम.सी.व्ही.सी. शाखेतून महेश मुमडवार (६४%), समीर सीडाम (६२.८३%) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यामधे विज्ञान शाखेत ९०% पेक्षा अधिक गुण घेणारे ४२ विद्यार्थी, ८५ ते ९०% दरम्यान गुण घेणारे ४७, ८० ते ८५% दरम्यान गुण घेणारे ५८ विद्यार्थी, तर ७० ते ८०% दरम्यान २४ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त झाले आहेत.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या. Chandrapur local news
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे प्रा. विद्या शिंदे, प्रा. डी.बी. हेपट, प्रा. संजय पवार, प्रा. जी. बी. दरवी, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. प्रविण चटप, प्रा. महेश यार्दी, प्रा. अरुण बर्डे, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
