News 34 chandrapur
चंद्रपूर - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे, सत्ता व पदासाठी शिवसेनेशी बंडखोरी करीत भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची अट शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुखासमोर ठेवली. Rebal eknath shindeशिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडीत 50 वर आमदार पळविले, आधी सुरत व नंतर गुवाहाटी मध्ये सर्व आमदारांना ठेवण्यात आले आहे. Independent mla kishor jorgewar
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार 23 जून ला रात्री गुवाहाटी मध्ये पोहचत शिंदे यांची भेट घेत त्यांच्या गटात सामील झाले. Real shivsainik
जोरगेवार गुवाहाटी पोहचल्यावर समाजमाध्यमांवर त्यांच्या विरोधात जोरदार टीका करण्यात आली, (विधानसभेतील जनतेला 200 युनिटचे आश्वासन दिले मात्र ते अजूनही पूर्ण झाले नाही, नागरिकांचे 200 युनिट गुवाहाटी मध्ये गेले अशी खरमरीत टीका जोरगेवार यांच्या विरोधात सुरू झाली आहे) निवडून आल्यावर भाजपला समर्थन, नंतर महाविकास आघाडीला व राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मतदान केल्याने जोरगेवार चर्चेत राहिले. Shivsena
मात्र आता पुन्हा शिंदे गटात सामील झाल्याने चर्चा व टीका दोन्ही सुरू झाली आहे.
अपक्ष आमदार असल्याने विधानसभेतील कामे पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी पुढे येतात मात्र आमदार जोरगेवार यांनी सदर अडचणी येऊ नये यासाठी हा खटाटोप केला असल्याचे समजते, विधानसभेतील नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्या यासाठी सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करणे गरजेचे असते.