News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर विधानसभेत 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला धूळ चाटवीत थेट विधानसभेत भरघोस मतांनी अपक्ष किशोर जोरगेवार यांनी एन्ट्री मारली.निवडून आल्यावर सरकार बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या व अचानक भाजप चे देवेंद्र फडणवीस यांना समर्थनाच पत्र आमदार जोरगेवार यांनी देत विधानसभेतील जनतेला धक्का दिला.
मात्र भाजपचे सरकार बनता बनता राहील, आणि राज्यात कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली व राज्यात सत्तेवर आले. Maharashtra politics crisis
त्यानंतर जोरगेवार यांनी तात्काळ महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला, अडीच वर्षे विधानसभेतील कामे केली, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी जुळवून घेत आमदार जोरगेवार यांनी विकासनिधी आणला.
मात्र 200 युनिट च्या मागणीवर विधानसभा जिंकणारे आमदार जोरगेवार 200 युनिट विजेसाठी आक्रमक भूमिका घेऊ शकले नाही. Rebal eknath shinde
अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमदार फोडले व महाविकास आघाडी सरकारला अस्थिर केले.
यावेळी सुद्धा आमदार जोरगेवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढत शिंदे गटाला समर्थन देत गुवाहाटी येथे दाखल झाले. Shivsena
त्यांच्या या भूमिकेचा अनेकांनी विरोध केला आहे.
ही पहिली वेळ नाही, आमदारांची भूमिका "डमरू" सारखी - काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी
शिंदे गटाला समर्थनाची भूमिका आमदार जोरगेवारांची चुकीची आहे, आमदार जोरगेवार हे प्रत्येकवेळी आपली भूमिका "डमरू" सारखी बदलत असतात, विधानसभेतील जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवीत भरघोस मताने निवडून दिले, व लगेच जोरगेवार हे देवेंद्र फडणवीसांना समर्थन द्यायला गेले तेव्हाही त्यांनी चूक केली आजही केली आहे.
चंद्रपूरच्या जनतेचा त्यांनी विश्वासघात केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सर्वात जास्त निधी आमदार जोरगेवार यांना दिला त्यानंतरही त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत शिंदे गटाला समर्थन दिले, ही अत्यंत चुकीची बाब आमदार जोरगेवार यांनी केली आहे.
200 युनिटचे काय झालं ते त्यांनी आधी सांगावे.
आमदार जोरगेवार यांचं समर्थन प्रखर हिंदुत्वाला आहे काय? हे त्यांनी जाहीर करावं - राष्ट्रवादी शहर अध्यक्ष राजीव कक्कड
वर्ष 2019 ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती गटातून अपक्ष निवडणूक लढवीत भाजप व कांग्रेस सारख्या पक्षांना मात देत किशोर जोरगेवार विजयी झाले.
विधानसभा निवडणुकीत सर्व धर्मियांनी भाजपला दूर करीत भरघोस मते जोरगेवार यांच्या पदरी टाकली होती.
निवडणूक जिंकल्यावर लगेच देवेंद्र फडनविस यांना पाठिंबा मात्र भाजपची सत्ता न बसल्याने महाविकास आघाडीला जोरगेवार यांनी पाठिंबा दिला.
अडीच वर्षे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून चंद्रपूर, घुग्घुस शहरासाठी निधीही आणला, अनेक विकासात्मक कामे त्यांनी केली, आमदार मुनगंटीवार व जोरगेवार यांच्या खडाजंगी झाल्याने मंजूर झालेल्या निधीचा श्रेय घेण्याचा प्रकार चंद्रपुरातील नागरिकांनी बघितला आहे.
मात्र आता महाविकास आघाडीमधून एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा वेगळा गट पाडत सरकारला अस्थिर केले.
विधानसभेतील जनतेला धक्का देत त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले.
मात्र एकनाथ शिंदे यांनी आम्ही प्रखर हिंदुत्वासाठी एक झालेलो आहे अशी प्रतिक्रिया माध्यमासमोर दिली असताना आमदार जोरगेवार यांचं समर्थन हिंदुत्वासाठी आहे का? हे त्यांनी विधानसभेतील जनतेसमोर जाहीर करावं.
शिंदे गट भाजपला पाठिंबा देणार आहे हे आता जगजाहीर झाले आहे, अपक्ष आमदार विकासकामांसाठी गुवाहाटी मध्ये दाखल झाले की हिंदुत्वासाठी याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं.
तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न - डॉ. मंगेश गुलवाडे, भाजप अध्यक्ष
राज्याच्या राजकीय घडामोडी बघता शिवसेनेचे बंडखोर गटाला आमदार जोरगेवार यांचं समर्थन हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असून भाजप त्यांच्या निर्णयाबद्दल काही प्रतिक्रिया देणार नाही.
विरोधी बाकावर बसून सुद्धा विकासनिधी खेचून आणता येतो - सुनील मुसळे, आप जिल्हाध्यक्ष
200 युनिटच्या नावावर जनतेला मत मागत जोरगेवार विधानसभेत दाखल तर झाले मात्र नंतर 200 युनिटच्या प्रश्नावर ते गप्प राहिले.
निवडून आल्यावर भाजप मग महाविकास आघाडी व आता शिंदे गटाला समर्थन हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे.
सत्तेत असल्यावर कामे होतात हे चुकीचे आहे आपण विरोधी बाकावर बसून सुद्धा कामे करू शकतो पण तसे दमदार नेतृत्व असायला हवं.
जोरगेवार यांनी वारंवार समर्थन बद्लवित आपला नवा रंग विधानसभेतील जनतेला दाखवीत त्यांचं अमूल्य मत वाया घालविले आहे.
दिल्ली असो की पंजाब आप चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी निवडून यायच्या आधी जनतेला 200 युनिट मोफत देण्याचे आश्वासन दिले, व निवडून आल्यावर वचनपूर्ती केली.
मात्र जोरगेवार यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.
आमदार जोरगेवार यांचं समर्थन हे व्यक्तिगत, जनता आपलं मत येणाऱ्या निवडणुकीत देणार - पप्पू देशमुख अध्यक्ष जनविकास सेना, मनपा माजी नगरसेवक चंद्रपूर
जोरगेवार यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, मात्र जनतेने आपल्याला का निवडून दिलं? हा विचार त्यांनी करायला हवा, महाविकास आघाडीच्या कामाशी नाराज असलेले सुद्धा आज बंडखोर आमदारांच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसत नाही आहे.
एकनाथ शिंदे हे हिंदुत्वासाठी शिवसेनेतून बाहेर पडले असले तरी जर अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले असते तर तेव्हा हिंदुत्व त्यांना लक्षात राहील असत का? हा प्रश्न महत्वाचा आहे.
चंद्रपूर मनपात मी स्वतः अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलो असता मला निधीसाठी खूप भांडावे लागले, पण निधी कसा खेचून आणायचा हे आपल्याला जमलं पाहिजे नाहीतर मी माझ्या प्रभागासाठी विकासनिधी आणणार नाही तर माझ्या नेतृत्वावर शंका निर्माण होणार.
निधीसाठी मी कोणत्याही पक्षाला समर्थन सुद्धा देणार नाही.
जोरगेवार यांनी जी भूमिका घेतली ती प्रथम दर्शी अयोग्य आहे, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनता त्यांना उत्तर मताद्वारे देणारचं.
चंद्रपूर जिल्ह्याला 200 युनिट मोफत द्यावे हे त्यांनी आता लेखी घ्यावे - वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष भूषण फूसे
चंद्रपूर विधानसभेतील जनतेनी किशोर जोरगेवार यांना 200 युनिट मोफत मिळणार या वचनावर भरघोस मते देत निवडून दिले मात्र निवडून आल्यावर त्यांची 200 युनिट बद्दलची भूमिका न समजण्यासारखी झाली.
यापुढे चंद्रपूरच्या जनतेनी अपक्ष आमदाराला निवडून देऊ नये कारण अपक्ष आमदारांची काही विचारधारा नसते, त्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी शिंदे गटाला समर्थन दिले आहे.
विधानसभेतील जनतेबद्दल आमदार जोरगेवार यांना खरी आपुलकी असेल तर त्यांनी शिंदे गटाकडून सत्ता आल्यावर 200 युनिट मोफत द्यावे असे लेखी घ्यावे.
टीका करणाऱ्यांना आमदार जोरगेवार यांनी बेधडक उत्तर दिले आहे.
शिंदे गटाला समर्थन देणारे चंद्रपूर चे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली भूमिका जाहीर केली.
जर विधानसभेचा विकास करायचा असेल तर अपक्ष आमदारांना सत्तेच्या बाजूला रहावे लागते.
राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीत मी महाविकास आघाडी सोबत होतो, आज शिंदे यांनी आमदारांचा जो वेगळा गट तयार केला तेही सर्व महाविकास आघाडी मधीलच आहे, एकनाथ शिंदे जे निर्णय घेणार व ज्यांना पाठिंबा देणार व सरकार स्थापन करणार त्या बाजूने आम्ही राहू.
विधानसभेचा सर्वांगीण विकास हाच माझा उद्देश्य आहे.
जनतेनी मला विजयरुपी जो आशीर्वाद दिला त्यावर मी त्यांना निराश करणार नाही.
आजपर्यंत मी विधानसभेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला, नागरिकांच्या समस्यांना विधानसभेत वाचा फोडली, प्रश्न मांडले पुढे सुद्धा माझी हीच भूमिका असणार आहे. चंद्रपूर विधानसभेतील रेंगाळलेला बाबूपेठ उड्डाणपूल यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी नगरविकास मंत्री शिंदे कडून मंजूर करून आणला, घुग्घुस नगरपरिषदेची निर्मिती व मनपा हद्दवाढीसाठी प्रयत्न यासह चंद्रपूर शहरातील नागरिकांना पट्ट्याचे वाटप होणार आहे.
200 युनिट ची मागणी मी विसरली नसून त्यासाठी माझे प्रयत्न कायम सुरू राहणार आहे. नवी सरकार स्थापन झाली की संबंधित मंत्र्यांना 200 युनिट चंद्रपूर जिल्ह्याला मोफत द्या अशी मागणी मी रेटून धरणार आहे.