News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मूल - डॉ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर, कर्मविर महाविद्यालय, मुल व राष्ट्रसंत तूकडोजी महाराज महाविद्यालय चिमुर व आंबेडकरवादी इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आई.सी.एस.एस.आर व्दारे प्रायोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती पर्वावर डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनावर आधारीत दोन दिवसीय आंतरविद्याशाखिय आंतरराष्ट्रीय परीषदचे आयोजन होत आहे.
या परिषदेला भारतातील विविध विषयाचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्था प्रामुख्याने येणार आहेत या प्रसंगी युजिसी व्दारे मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेत संशोधकांचे लेख प्रकाशीत करण्यात येणार आहे.
ही परिषद एकून सहा सत्रात घेण्यात येणार त्यात सर्वप्रथम दि. २५ जून २०२२ ला सकाळी ठीक ११ वाजता परिषदेचे उद्घाटन होईल त्यात परीषदेला उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली चे सन्माननिय कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख पाहुने अॅड. बाबासाहेब वासाडे, विजभाषक युजिसी चे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेवराव थोरात, आंबेडकरवादी इतिहास परिषदचे अध्यक्ष मान. डॉ. संदेश वाघ तसेच सचिव डॉ. संतोश बन्सोड व आभासी पध्दतीने अमरीकेतून या परीषदेला डॉ. लक्ष्मण सत्या व डॉ. रोझल भडके संस्थेचे अध्यक्ष मान अरूण घोटेकर, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. उपाध्यक्ष मान अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, सहचिव कुणाल घोटेकर सदस्य अडॅ. राहुल घोटेकर व महाविद्यालयाचे मान. प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर, प्रभारी प्राचार्य डॉ. कार्तिक पाटील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय चिमुर व प्रभारी प्राचाय डॉ. अनिता वाळके कर्मविर महाविद्यालय, मुल हे उपस्थित असणार आहेत. दुपारी ठीक १:३० ते ३:३० पर्यंत डॉ. नारायण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पहीले सत्र घेतले जाईल त्यात डॉ. श्रिनिवास खांदेवाले, नागपूर, डॉ. लक्ष्मण माने सातारा, नागपूर विद्यापिठ नागपूरचे प्राध्यापक डॉ. विकास जांभुळकर, डॉ. श्याम कोरेट्टी, डॉ शैलेंद्र लेंढे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सायंकाळी ठीक ४:०० ते ६:०० वा. डॉ. अनिल शिंगारे, नांदेड यांच्या अध्यक्षेतेखाली दुसरे सत्र घेतले जाईल त्यात डॉ. सोहनलाल सांपला जर्मनी, डॉ. गौतम चॅटर्जी यु.के, डॉ. प्रदिप मेश्राम, भंडारा, डॉ. प्रकाश शेंडे, चंद्रपूर, डॉ. सुखदेव सिंग, हरियाणा, डॉ. सरोज कुमार दिल्ली, डॉ. अजित कुमार दिल्ली हे उपस्थितीत राहणार आहेत.
दि. २६ जुन २०२२ ला सकाळी १०:०० ते ११:०० डॉ. मिता रामटेके, ब्रम्हपूरी यांच्या अध्यक्षेतेखाली शोध निबंध वाचन होणार आहे यात प्रमुख वक्ते म्हणून रातुम नागपूर विद्यापिठ नागपूरचे माजी अधिष्ठाता डॉ. भुपेश चिकटे व रातुम नागपूर विद्यापिठ नागपूरचे इतिहास अध्ययन मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. रमेश बोभाटे हे उपस्थितीत राहणार आहेत. सकाळी ११ ते १२ पर्यंत चवथे सत्र gondwana university गोंडवाना विद्यापिठा, गडचिरोली च्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. रश्मी बंड यांच्या अध्यक्षेतेखाली असून त्यात प्रमुख वक्ते डॉ. इंदिरा सुर्यवंशी हेद्राबाद, डॉ. मुकेश कुमार, दिल्ली डॉ. अनिरूध्द दिल्ली, डॉ. प्रिती बगडे सागर, डॉ. अंजू गुरव, दिल्ली हे असणार आहेत. शेवटी समारोपीय कार्यक्रम संस्थेचे सदस्य अडॅ. राहुल घोटेकर यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली चे सन्माननिय प्र-कुलगुरू डॉ. श्रिराम कावळे उपस्थितीत राहणार आहेत. तसेच गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली चे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, कुरुक्षेत्र विद्यापिठ हरीयाना चे अधिष्ठाता डॉ. एस. के चहल, संस्थेचे सचिव वामनराव मोउक शिक्षण प्रसारक मंडळ, मुल चे कार्याध्यक्ष संजय वासाडे, गांधी सेवा शिक्षण संस्थेचे सचिव विनायकराव कापसे व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ संजय बेले हे प्रामुख्याने उपस्थितीत राहतील. या परिषदेच्या निमित्ताने आंबेडकरवादी इतिहास परिषद च्या वतीने विविध क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या प्राध्यापक वृंदांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तरी दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रिय आंतरविद्याशाखीय परिषदेला या क्षेत्रातील संशोधक, विद्यार्थ्यो, प्राध्यापक वर्ग यांनी आवुर्जन उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवहान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर यांनी केले आहे.