News 34 chandrapur
चंद्रपूर - कलाकारांना वापरून घेण्याची पद्धत आजही रूढ आहे. बरेच वेळा त्याला मानधनही दिले जात नाही. यामुळे कलाकारांचा आत्मविश्वास ढासळतो. फुकट वापरून घेण्याची प्रथा बंद करा.स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन द्या.त्यांच्या कलेचे कौतुक करा. विदर्भात प्रतिभा आहेत.मुंबईचे नाटक नाट्यगृहात महागडे तिकीट घेऊन बघताना,मग हाच व्यवहार स्थानिक नाटकांबाबत व्हायला हवा.
विदर्भातही प्रति फिल्म इंडस्ट्री तयार होऊ शकते,असे प्रतिपादन चला हवा येऊ द्या चे मराठी स्टार कलाकार अंकुर वाढवे यांनी केले. Chala hawa yeu dya
विदर्भातही प्रति फिल्म इंडस्ट्री तयार होऊ शकते,असे प्रतिपादन चला हवा येऊ द्या चे मराठी स्टार कलाकार अंकुर वाढवे यांनी केले. Chala hawa yeu dya
ते चंद्रपुर येथे पत्रकारांशी संवाद साधतांना रविवार 19 जून ला चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ येथे बोलत होते.
यावेळी नाट्य कलाकार डॉ.जयश्री कापसे,निशा धोंगडे, खेलसेना मंडळचे राजेश नायडू,पत्रकार बाळू रामटेके व प्रशांत विघ्नेश्वर यांची उपस्थिती होती.
वाढवे म्हणाले,इतरांपेक्षा व्यक्तिमत्व वेगळे असले की त्याला डिवचले जाते.परंतु संघर्ष सुरू ठेवला की यश मिळते.आणि नंतर त्या कलाकाराचे कौतुक होते. स्वतःला सिद्ध करणे हा एकच पर्याय यावर आहे. ऍक्टर(नट)बनणे एव्हढ्यापुरते हे क्षेत्र नसून यातील इतरबाबी शिकणे हे सुद्धा करियर होऊ शकते.असे ते म्हणाले. जेव्हा आपण एखादे पात्र(कॅरेक्टर) करीत असतो तेव्हा त्याची भाषा आपल्याला यायला हवी. त्यासाठी वाचन करा,नाटकं बघा व चित्रपटातील पत्रांचा अभ्यास करा असे आवाहन त्यांनी नवोदित कलाकारांना केले. Marathi actor
अंकुर वाढवे खेल मंडळ चंद्रपूर,पार्थशर समाचार व चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चंद्रपुर द्वारा आयोजित अभिनय व लघु चित्रपट कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.