News 34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षण संस्था चालक, समाजसेवी पत्रकार पुरुषोत्तम चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त गुड मॉर्निंग ग्रुप बाबूपेठ व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने रक्तदान शिवीर व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम 19 जून ला आयोजित करण्यात आला होता. आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त राजेश मोहिते, ग्रामीण पत्रकार संघाचे चंद्रपूर अध्यक्ष राजेश सोलापन, प्रवीण कुंटे, डिके आरिकर, विनोद पन्नासे, धर्मेश निकोसे, अनिल देठे, विजय पाटील, जगन्नाथ झाडे, चंद्रशेखर गनूरवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी आयुक्त राजेश मोहिते यांनी चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढे असेच सामाजिक उपक्रम राबवित आपण सर्वांनी हा वारसा पुढे न्यावा असे आवाहन केले.
ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन यांनी चौधरी यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला, आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना सुद्धा चौधरी यांनी आपल्या जीवनात बराच संघर्ष केला मात्र पुढे येणाऱ्या समस्यांना न घाबरता सामना करीत त्यांनी यशाचे शिखर गाठले.
मार्गदर्शन कार्यक्रमानंतर रक्तदान शिबिरात अनेकांनी सहभाग घेतला, स्वतः चौधरी यांनीही रक्तदान केले, सदर कार्यक्रमात एकूण 21 नागरिकांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुड मॉर्निंग ग्रुप व ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.