News 34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौपनव्या वाढदिवसानिमित्त लखमापूर येथील हनुमान मंदिरात राज ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळो व त्यांच्या विचारातील महाराष्ट्र घडो यासाठी हनुमान चालिसा hanuman chalisha पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तसेच, एमआयडीसी परिसरातील वाढते प्रदूषण लक्षात घेता वृक्षारोपण यावेळी करण्यात आले.
तसेच खरीप हंगाम सुरू झाला असून महागाईची मुळे त्रस्त झालेल्या वांढरी येथील अल्पभूधारक गरजू शेतकऱ्यांना मनसेतर्फे सोयाबीन, कापूस व धानाचे मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मनवीसे जिल्हाध्यक्ष तथा गोंदिया संपर्कप्रमुख राहुल बालमवार यांच्या तर्फे करण्यात आले होते. raj saheb thakre birthday
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, व्यापारी सेने जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, विधी व जनहित कक्ष जिल्हाध्यक्षा मंजुषा लेडांगे, जिल्हाउपाध्यक्ष राजू कुकडे, आनंद बावणे, तालुकाअध्यक्ष प्रकाश नागरकर,ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे,शहर संघटक मनोज तांबेकर, मनवीसेचे नितीन पेंदाम, नितेश जुमडे, राकेश बोरीकर, अक्षय चौधरी, सुयोग धनवलकर,पियुष धुपे, मयूर मदनकर, करन नायर, तुषार येरमे, राकेश पराडकर, चैतन्य सदाफळ, वर्षा भोमले व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


