News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बाबीचा आढावा व कार्यकर्त्यांच्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांनी 6 जून ला हजेरी लावली.आपल्या दौऱ्यादरम्यान खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. Air pollution
चंद्रपुरात दिवसेंदिवस प्रदूषणात होणारी वाढ यावर काही उपाययोजना करू असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Effects of air pollution
पत्रकारांशी संवाद साधतांना खा.सुळे म्हणाल्या, एकीकडे ताडोबा सारखी जंगल समृद्धी आहे तर दुसरीकडे भयावह प्रदूषण, ही गंभीर बाब आहे. यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. तेव्हा तज्ञाकडून प्रदूषणाची नेमकी स्थिती जाणून घेऊन दोन वर्षाची योजना बनवावी लागेल. Air quality त्यातून ठोस तोडगा निघायला हवा. अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली. येथे मानव-वन्यजीव संघर्ष मोठा आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखत या प्रश्नावर ठोस उपाय योजना करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. पर्यावरणावर काम करणाऱ्या निरी संस्थेमार्फत या विषयाची चाचपणी करून त्यांच्या सूचनांवर काम केले पाहिजे.पर्यावरण मंत्र्यांचा दौरा देखील येथे केला जाऊ शकतो असे त्या म्हणाल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महानगर जिल्हाध्यक्ष राजू कक्कड,बेबीताई उईके,नितीन भटारकर यांची उपस्थिती होती.
MP Supriya Sule
आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी बाहेर पाठविले
चंद्रपूरच्या समस्यांवर चर्चा करण्यापूर्वी,खा.सुप्रिया सुळे यांनी,मुख्य पदाधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी अनेकांनी समस्या विशद केल्या. ज्यात सिटीपीएस,वेकोलीचे प्रदूषण,एमपीसीबीची भमिका,फोल ठरलेली 100 कोटींची मलनिस्सारण योजना,टायर जाळून सुरू असलेला उद्योग अश्या अनेक विषयाकडे लक्ष वेधले.नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सर्व समस्या माहीत असून त्यांचा नियमित दौरा असतो,असेही अनेकांनी नमूद केले.
*अम्माचा टिफिन या उपक्रमाचे कौतुक*
कर्तुत्वान महिला आणि तिचा वसा समोर नेणारा कार्यक्षम मुलगा हे नातं खूप महत्वाच आहे. अम्माने शुन्यातुन विश्व निर्माण केल. तेच विचार आणि संस्कार घेऊन आ. जोरगेवार यांनी सुरु केलेला अम्माचा टिफिन हा उपक्रम अप्रतिम आहे. हे काम पाहुन अम्माच्या भेटीला आलेली मी आज त्यांच्या प्रेमात पडली अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अम्माचे आणि पर्यायाने अम्माचा टिफिन या उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
यावेळी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा शामकुळे, राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष राजिव कक्कड, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितिन भटारकर, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल आदिंची उपस्थिती होती.
