News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल- मुल तालुक्यातील मौजा टेकाडी येथील ग्रामपंचायतिची एक सदस्य पदाची पोट निवडणूक दि.5/6/22 ला पार पडली. सदरहू निवडणुक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांचे नेतृत्वाखाली कांग्रेसचे तालुका अध्यक्ष घनशाम येनुरकर संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संदिप कारमवार अरविद बोरुले साजिद शेख यांचे मार्गदर्शनात लढवण्यात आली असता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार सौ. अस्मिता मंगाम यांचा 42 मतांनी विजय झाला. यात विरोधकांना हार पत्करावी लागली.
