News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल: सिंदेवाही- मुल मार्गावरील मुल पासून २ किमी अंतरावर अज्ञात वाहनाने ३ दुचाकीस्वारास धडक दिल्याने १ ठार तर ३ गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान घडली. Road accident
आदित्य प्रकाश काळबांधे वय (२२) वर्षे असे मृतकाचे नाव आहे. बंटी अलगुनवार वय (२२) वर्षे हे गंभीर जखमी असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व जखमींना उपजिल्हा रुग्णालय मुल येथे हलविण्यात आले असून पुढील सखोल तपास मुल पोलीस करीत आहे.
