चंद्रपूर - वर्ष 2012 मध्ये सुगंधित तंबाखुला राज्यभरातून शासनाने हद्दपार करीत प्रतिबंध केले.
आज 10 वर्षांनी सुद्धा सुगंधित तंबाखू तस्करी खुलेआम सुरू आहे, तंबाखू माफियांना पोलीस अजूनही नियंत्रित करू शकले नाही.
जागतिक तंबाखू निषेध दिवसाला प्रशासन, लोकप्रतिनिधी फक्त व्यसन सोडा हे मार्गदर्शन करतात मात्र ज्यामुळे नागरिक व्यसनाधीन होतात त्यावर काही नियंत्रण आणण्याचा आव आणत नाही. Chandrapur Police
सुगंधित तंबाखू प्रतिबंधित असताना सुद्धा चंद्रपूर शहरातील प्रत्येक चौकात ख्रऱ्या च्या स्वरूपात मिळत आहे. Aromatic tobacco
20 रुपयांच्या खरऱ्यासाठी नागरिक कॅन्सर सारखा आजाराला निमंत्रण देत आहे.
आज तोंडाच्या कॅन्सरने जिल्ह्यात डोकं वर काढले आहे. No tobacco day 2022
नुकतेच लोकसभा युवक कांग्रेसचे माजी अध्यक्ष हरीश कोत्तावार यांचं निधन तोंडाच्या कॅन्सर मुळे झालं. Oral cancer stages
तरीही जिल्ह्याचे दमदार पालकमंत्री विजय वडेट्टीवार सुगंधित तंबाखू वर कारवाई व्हावी यावर काही बोलत नाही, स्थानिक आमदार, खासदार सुद्धा या तस्करीवर गप्प आहे.
कारण हा आजार पसरविणाऱ्या यमराज वसीम चे साटेलोटे अनेक नेत्यांशी आहे.
मागील वर्षी कांग्रेस पदाधिकारी यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली होती त्यामध्ये कांग्रेस पदाधिकारी वसीम ला धंदा करू द्या अशी विनवणी करीत होता. Mouth cancer
वसीम आधी बाहेरून माल बोलवायचा मात्र कोरोना काळात चंद्रपुरातचं तो नकली सुगंधित तंबाखू बनवू लागला, सुगंधित तंबाखू कारखान्यावर कारवाई सुद्धा झाली होती.
त्यानंतर MIDC येथील गोदामात नकली तंबाखू बनवीत त्याची पॅकिंग करण्याचे काम सुरू झाले, तस्करीचा हळूहळू विस्तार झाला, ही तस्करी जिल्ह्यात सुरू झाली, अनेक तालुक्यात वसीम ने माणसे नेमली, त्यांच्या मार्फत सुगंधित तंबाखू जिल्ह्यात मोठया प्रमाणात पसरू लागले.
नंतर जयसुख सोबत हातमिळवणी करीत वसीम या धंद्यांचा मालक बनला, बल्लारपूर शहरात 1 गोडावून त्यानंतर चंद्रपुरातील बागला चौक परिसरात माल उतरविण्याचे काम सुरू झाले.
3 डिसेंम्बर 2020 ला MIDC गोडावून येथे सुगंधित तंबाखू, पान मसाला, रजनीगंधा, विमल माल मिळाल्याने वसीम च्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
12 ऑक्टोबर 2021 ला पुन्हा वसीम च्या गोडावून मध्ये सुगंधित तंबाखूचा साठा मिळाल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात आली होती.
सध्या तरी गेल्या 2 वर्षात वसीम वर फक्त 2 कारवाया झाल्या, तरीसुद्धा वसीम वर अजूनही प्रतिबंधक कारवाई न केल्याने त्याने आपला धंदा मोठया प्रमाणात वाढविला आहे.
त्याच्या या धंद्याने जिल्ह्यात तोंडाचा कॅन्सरची घोडदौड सुरू झाली, युवक पिढी व्यसनाधीन झाली आहे.
भविष्यातील पिढीचं आयुष्य वसीम कॅन्सर देत उध्वस्त करीत आहे, चंद्रपूर पोलिसांनी या माफियांवर प्रतिबंधक कारवाई करायला हवी.
