News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील विनायक नगर येथील लोकांना सहकारी राईस मिल च्या मागील बाजूस निघणाऱ्या त्या धुळामुळे त्रास होत आहे. याचे 2018 पासून मंत्री तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन सुद्धा दिले. पण कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. तसेच विनायक नगर येथील शेकडो नागरिकांना कोणीही आजवर न्याय दिला नाही ते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. Air pollution
सिंदेवाही सदर. . . मिल चा धुर देते .. . ही बातमी News34 वर बघताच सिंदेवाहीचे ठाणेदार घारे यांच्या लक्षात येताच त्यांनी आज सकाळी नऊ वाजता शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील विनायक नगर येथील नागरीकांची भेट घेऊन व सदर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. Air quality
त्यामुळे विनायक नगर येथील नागरिकांचा सदर समस्या बाबत पोलीस विभागाशी काहीही संबंध नसताना देखील ते समस्या जाणून घेतल्या यामुळे ठाणेदार घारे यांचे विनायक नगर येथील नागरिकांनी आभार मानले. Effects of air pollution
