News 34 chandrapur
चंद्रपूर - अनेक वर्षांपासून रखडलेले काम म्हणजे बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुल, ज्यावेळी हा उड्डाणपुल मंजूर झाला त्यावेळी बाबूपेठवासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला.मात्र निधी अभावी हा उड्डाणपूल मागील 4 वर्षांपासून अर्धवट स्थितीमध्ये आहे, आता या उड्डाणपुलासाठी 5 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर होताच, शहरात पोस्टर बॉयस चा धुमाकूळ माजला. Babupeth railway flyover
विविध ठिकाणी लागलेले बॅनर नागरिकांचे लक्ष वेधत होते, माजी अर्थमंत्री विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे बॅनर शहरात झळकले, मग काय स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी सुद्धा सदर निधी माझ्या पाठपुराव्याने मंजूर झाला असा दावा केला. sudhir mungantiwar
दावे प्रतिदावे सुरू झाले पण सदर निधी आणला कुणी हा नागरिकांच्या डोक्यात फिरत असलेला प्रश्न अनुत्तरित आहे.
शहरातही सध्या बाबूपेठ उड्डाणपूल Trending वर आहे.
याच दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी बाबूपेठ प्रभागात जात नागरिकांच्या आशीर्वादाने हा निधी आम्ही खेचून आणण्यात यशस्वी ठरलो व हा उड्डाणपूल यावर्षी पूर्ण होणार अशी ग्वाही दिली. kishor jorgewar
विशेष म्हणजे सदर निधी मंजूर करण्यात आला असे शासकीय पत्र जारी करण्यात आले, शासनाने सुद्धा कुणी नाराज होऊ नये यासाठी दोन्ही आमदारांना तुमच्या पत्रांची दखल घेत निधी मंजूर केल्याची बाब कबूल केली.
निधी कुणीही आणो पण या उड्डाणपुलाचे होणे अत्यंत गरजेचे आहे, आता चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने जो-तो कामाचे श्रेय घेत आहे, पालिका पदाधिकारी यांनी सुद्धा कार्यकाळ संपन्याआधी अनेक कामे मंजूर करून घेत उदघाटन समारंभ पार पाडले. railway flyover
आजही अमृत चे पाणी नागरिकांना मिळत नाही आहे, उदघाटन झाले मात्र शुभारंभ अजूनही झाला नाही.
रस्त्यांचे काम तसेच आहे, बागला चौक ते लालपेट कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे लोकप्रतिनिधी यांना वाकोल्या दाखवीत आहे. chandrapur news
सदर उड्डाणपूल मंजूर होण्याआधी राजकारणात अडकला होता, एका व्यापाऱ्यांची दुकानांची चाळ वाचविण्यासाठी पुलाचा नकाशा बद्लविण्यात आला होता. या पुलासाठी गोरगरीब जनतेचे घरे पाडण्यात आली मात्र व्यापाऱ्यांचे सर्व दुकानांना धक्का न लावता सुरळीत ठेवण्यात आले. chandrapur news today
भाजप व अपक्ष आमदाराने श्रेयाचे बॅनर लावले मात्र महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष कांग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने अजूनही याबाबत बॅनर लावले नाही.


