News 34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई - विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुपचूप आमदारांना सोबत घेत सुरत ला पोहचत पक्षात बंड केले.महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाल्यावर शिंदे यांच्या मनातील खदखद पुढे आली. Udhav thackeray
महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त घटक पक्षांना फायदा झाला सेनेच्या आमदारांना कधीही पुरेसा निधी मिळाला नाही, भाजपसोबत युती तोडत शिवसेनेने मोठे नुकसान केले.
मात्र आता शिवसेना व भाजपने हिंदुत्वासाठी एकत्र येत सरकार स्थापन करावे अशी मागणी ही त्यांनी केली. Rebal eknath shinde
भाजपचा मुख्यमंत्री तर शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला त्यांनी जाहीर केला, मात्र शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना एकटी पडली, सेनेकडे आता फक्त 14 आमदार असून पुढे काय याचा प्रश्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पडला आहे.
शिंदे यांनी अपक्ष व शिवसेनेचे आमदार असा 50 च्या वर आकडा असल्याचा दावा केला आहे, महाविकास आघाडी सरकारमधून लवकर बाहेर पडणार असल्याची माहिती पुढे येत आहे. Shivsena
मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधत आमदारांना आवाहन केलं की तुम्ही मला सांगा मी आपल्याला मुख्यमंत्री पदी नको आताच राजीनामा देत खुर्ची सोडतो, शिवसेनेच्या झाडाला पोकळ करू नका, मी आता मुख्यमंत्री यांचा वर्षा बंगल्यावरील बस्तान मातोश्री वर हलवीत आहो, मला विश्वास आहे माझे शिवसैनिक परत येतील.
मात्र ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाला शिंदे यांनी राजीनामा द्यायचा असेल की नाही हा उद्धव ठाकरे यांचा प्रश्न आहे, मात्र आम्हाला महाविकास आघाडी सोबत रहायचे नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. Mahavikas aghadi government
शिंदे समर्थक आमदार आम्ही शिवसेनेचा गट आहो असे त्यांनी जाहीर केले आहे.
शिंदे व ठाकरे यांचा हा वाद कुठपर्यंत जाणार? सरकार पडणार काय? ही तर येणारी वेळच सांगणार.

