News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम )
सिंदेवाही - २१ जुन मंगळवार ला तहसील कार्यालय मध्ये दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील भारत विद्यालय मधील इयत्ता दहावी मध्ये 98.20 % मिळवून चंद्रपूर जिल्ह्यातुन प्रथम येऊन सिंदेवाही तालुक्याचा मान उंचावणारी कु. खुशी पडोळे या विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तसेच भेटवस्तू देऊन अभिनंदन केले.
यावेळी सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे, ठाणेदार घारे, नायब तहसीलदार धात्रक व गट विकास अधिकारी शिखरे, गट शिक्षणाधिकारी पालवे यांची उपस्थिती होती. Mahassc result
यावेळी सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे, ठाणेदार घारे, नायब तहसीलदार धात्रक व गट विकास अधिकारी शिखरे, गट शिक्षणाधिकारी पालवे यांची उपस्थिती होती. Mahassc result
तहसील कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात महसूल अधिकारी उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे तहसीलदार जगदाळे यांनी अभिनंदन केले आहे. Class 10th result
विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी, परीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन तहसीलदार जगदाळे यांनी मार्गदर्शनपर भाषणात म्हटले.

