News 34 chandrapur
चंद्रपूर - अवकाळी पाऊस, वादळवाऱ्यामुळे तुटलेल्या वीजतारा व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, यासंदर्भात माहिती किंवा इतर तक्रारी असल्यास - चंद्रपूर मंडलातील नागरीकांनी/ग्राहकांनी 7875761195 व गडचिरोली मंडलातील नागरीकांनी/ग्राहकांनी 7875009338 यावर संपर्क साधावा. तसेच व्हाट्सअप करावे, असे आवाहन महावितरण द्वारा करण्यात येत आहे.
अवकाळी पाऊस, वाऱ्याने, वादळाने किंवा तत्सम कारणाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. वादळी वारा यामुळे झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, तर दिलेल्या व्हाटस ॲप क्रमांकांवर लगेच कळवावे. महत्वाचे म्हणजे घटनास्थळाचा, फोटो व पत्ता सदर व्हॉटसॲप मॅसेजमध्ये नमूद करावा.
Msedcl awarness
तसेच, शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 24 तास सुरु असणार्या कॉलसेंटर्सचे 1800-102-3435 किंवा 1800-233-3435, 19120, 1912 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री toll free क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. Strong winds वीजसेवेच्या तक्रारींसह वादळ, वाऱ्यामुळे अवकाळी पावसाने वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे.
वीजग्राहकाने कॉल सेंटरमध्ये रजिस्टर्ड केलेल्या तीनपैकी कोणत्याही वैयक्तिक दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. महावितरण च्या मंडळ स्तरावरील नियंत्रण कक्ष येथे चंद्रपूर मंडलातील ग्राहकांनी 7875761195 व गडचिरोली मंडलातील ग्राहकांनी 7875009338 याक्रमांकांवर संपर्क साधावा. माहिती देण्यासाठी किंवा तक्रारी करण्यासाठी याच क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणद्वारा करण्यात येत आहे.