News 34 chandrapur
वरोरा - डिमांड काढून देण्याच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणीमधील सहायक अभियंता वरोरा येथील श्रीनू चुक्का यांना 6 हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. Acb trapफिर्यादी हे वरोरा येथील रहिवासी असून सोलर सिस्टम फिटिंग व इलेक्ट्रिशियन चे कामे करतो, सोबतचं ग्राहकांच्या घरी सोलर सिस्टम लावण्याचे काम करीत असून त्यासाठी डिमांड काढण्याच्या कामासाठी सहायक अभियंता चुक्का यांनी फिर्यादीला 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
फिर्यादीला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. Msedcl
लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी प्रकरणाची पडताळणी करीत सापळा रचला व महावितरण कार्यालय वरोरा येथे 27 जून ला फिर्यादीकडून श्रीनू चुक्का हे 6 हजार रुपये घेत असताना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. Bribe
सदरची कार्यवाही ही राकेश ओला पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपुर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती शिल्पा भरडे, तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ नरेश नन्नावरे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, राकेश जांभुळकर, वैभव गाडगे व चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.
पुढील तपास सुरू आहे. Take bribery
यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.