News 34 chandrapur गुरू गुरनुले
मूल - . मूल शहरातील बुधवारच्या आठवडी बाजारात चोरीचे प्रमाण वाढले असून मोबाइल, गळ्यातील चैन, दागिने, खिशातील पैसे महिलांच्या पर्स अशा मौल्यवान वस्तू दर बुधवारला बाजारातून गर्दीची संधी साधून सर्रास चोरी केल्या जात असल्याचा प्रकार आठवडी बाजारात घडत आहे.
Chandrapur police त्यामुळे भुरटे चोरी करणाऱ्या चोर युवकांची आणि चोर महिलांची टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील दोन आठवड्यापूर्वी आठवडी बाजारात भाजीपाला घेतांना एकाच दिवशी सात मोबाईल चोरीला गेल्याची माहिती आहे. तसेच परत नंतरच्या बुधवारी सुद्धा तीन मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले. महिलांच्या गळ्यातील दागिने देखील गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे. असा प्रकार कितीतरी दिवसापासून सर्रास घडत आहे परंतु जोपर्यंत पोलिसात लेखी तक्रार कोणी करीत नाही तो पर्यंत बाजारात चोरी होत आहे असे पोलिसांना लक्षात येत नाही. कुठलीही वस्तू बाजारात चोरीला गेली तर त्याबाबतची तक्रार तात्काळ पोलीस स्टेशनला द्यावी. जेणे करून पोलीस विभागाने लक्ष देऊन आठवडी बाजारात गस्त वाढवतील आणि चोरी पकडायला मदत होईल. Weekly market

शहरात बुधवार या दिवशी आठवडी बाजार असतो. या दिवशी आसपासच्या गावातून व बाहेर गावाहून व्यापारी, शेतकरी आपला माल विक्री करण्यास शहरात दाखल होतात. त्यामुळे बुधवारी बाजाराच्या दिवशी खूप गर्दी असते. हीच संधी साधून चोरटे हात साफ करतात. चैन मोबाइल चोरी, पैसे, पर्स चोरी असे प्रकार हमखास घडतात. Chain snatching
मोबाइल चोरीला गेल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी गांधी चौक येथील एका मेडिकल मधे औषधी खरेदी करतांना एका सुशिक्षित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कापण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु लगेच लक्षात आल्याने चोराचा प्रयत्न फसला. तसेच लग्नसमारंभात देखील चैन दागिने चोरीचे प्रकार वाढले आहे. बाहेर गावाहून येणारे टोळके ज्यात विशेषतः महिला असतात, तर लग्नात लग्न वऱ्हाडी म्हणून चांगल्या पोषाखात येणारे चोर, चोरी करून शहरातून निघून जातात, अशी शक्यता आहे. करिता मूलच्या पोलीस विभागाने त्वरित लक्ष घालून बाजार करणाऱ्या ग्राहकांना संरक्षण द्यावे. आणि चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दा पाश करावा अशी मागणी मूल नगरातील नागरिकांनी आणि बुधवारला बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांनी व ग्राहकांनी केली आहे.