News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - तालुक्यातील पेटगाव गावाला लागुन थोडया अंतरावर असलेल्या शेतामध्ये रेती तस्करांनी 20 ब्रास अवैध रेती चा साठा मोठया प्रमाणावर करून ठेवला होता, याबाबत तालुका प्रशासनाने सदर साठा तपासणी करून जप्त केलेला आहे.
मात्र सदर साठयातील रेती, रेती तस्कर हे संधीचा फायदा घेवून पेटगाव परिसरात घरकुल व इतर बांधकाम मोठया प्रमाणावर सुरू असुन त्यासाठीच हे रेती तस्कर रेतीचा साठा करून ठेवल्याची चर्चा आहे. Sand mafia
तालुका प्रशासनाने तालुक्यातील रेती तस्करांवर करडी नजर ठेवून आहेत, अनेकदा कारवाई सुध्दा केलेली आहेत, परंतु तहसीलच्या अधिकाऱ्यांचे नजर चुकवून या परिसरात अवैध रेती वाहतुक केली जात आहे, सदर साठा हा रेती तस्करांकडूनच केला असून ज्या शेतात रेती साठवणुक करण्यात आली.
त्यांची कसुन चौकशी केल्यास रेती तस्करांचा नांव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तहसीलदार जगदाळे यांनी म्हटले आहे ही कारवाई सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तलाठी मुरकुटे यांनी केली आहे.