चंद्रपूर - कोल इंडिया अंतर्गत येणाऱ्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड चंद्रपूर क्षेत्रातील माना भूमिगत कोळसा खाणीला 27 जून च्या रात्री आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. Western coalfields limited
सोमवार 27 जून ला रात्रपाळी मध्ये काम करायला गेलेल्या कामगारांना खाणीच्या आतून धूर निघताना दिसला त्यावेळी कामगार तात्काळ खाणीच्या बाहेर निघाले, सदर धूर कोळश्याला लागलेल्या आगीचा असल्याचे कामगारांनी सांगितले. Coal mine fire
मंगळवारी तात्काळ रेस्क्यू टीम ला पाचारण करीत माना कोळसा खाणीला पूर्ण सील करण्यात आले.
नागपूर, ताडाळी येथून बचाव पथक आले होते, डिजीएमएस चे वरिष्ठ अधिकारी सुद्धा निरीक्षणासाठी खाण परिसरात पोहचले.
Mana coal mine
Mana coal mine
निरीक्षणानंतर अधिकाऱ्यांनी माहिती दिली की कोळश्या मध्ये नेहमी आग लागत असते, खाणी च्या आतील कोळसा जळत असल्याने सदर घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही सर्व कामगार सुरक्षित आहे. Lalpeth