News 34 chandrapur
चंद्रपूर - महिलेला अश्लील शिवीगाळ करणे एकाला चांगलेच महागात पडले असून न्यायालयाने आरोपीला कोर्ट सुटेपर्यंत शिक्षा व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 2 दिवसाच्या शिक्षेचा निकाल दिला आहे. billingsgateपोलीस स्टेशन चंद्रपूर हद्दीत राहणाऱ्या महिलेला खिडकीजवळ लोखंडी पत्रा ठेवला म्हणून वाद घालत महिलेला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती. Chandrapur local news
महिलेच्या तक्रारींवर पोलिसांनी आरोपीवर कलम 294 व 506 अंतर्गत गुन्हा नोंद केला. तपास अधिकारी सुशील कुंभामवार यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरण न्यायालयात गेले असता सुनावणी दरम्यान न्यायालयाने 6 साक्षीदारांचा जबाब नोंदवीत पुराव्याच्या आधारे 14 जून ला आरोपीला न्यायमूर्ती एन.ए. माने यांनी सदर शिक्षा सुनावली.
यावेळी सरकारी सरकारी वकील प्रफुल बोहरा व पोलीस कर्मचारी ASI अनिल आकुलवार यांनी काम बघितले.
