News 34 chandrapur
चंद्रपूर - शासकीय इमारतीच्या पडक्या छतावर 14 जून च्या रात्री अंदाजे 25 वर्षीय युवकाचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. Chandrapur policeमृतक युवकाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यावर मृतकाची ओळख पटविण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे API जितेंद्र बोबडे, API संदीप कापडे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला.
गोपनीय माहिती मिळाल्यावर मृतक हा राजुरा निवासी राहुल विलास ठक रा. पेठ वार्ड असल्याची माहिती मिळाली. राहुल हा डॉ. चिल्लरवार यांच्याकडे वाहन चालकांचे काम करीत होता. Chandrapur lcb
आरोपीनी घटनास्थळी कोणताही पुरावा सोडला नसल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे झाले होते, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक बोबडे व कापडे यांनी सखोल तपास केला असता याबाबत मागील 1 वर्षांपूर्वी मृतक राहुलने एका महिलेच्या मोबाईवर मॅसेज केल्याने राहुल सोबत महिलेच्या मुलांनी राहुल ला मारहाण केली होती.
माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेची चमू महिलेच्या घरी पोहचली. Chandrapur crime
महिलेला मुलांबाबत विचारपूस केली असता लहान मुलगा घरी आढळला मात्र मोठा मुलगा नाशिक येथील MIDC मध्ये कुटुंबासहित राहत असल्याची माहिती मिळाली.
वैभव राजेश डोंगरे हा सध्या नाशिक ला आहे की नाही याबाबत माहिती घेतली तर तो 3 दिवसापासून चंद्रपूरला आल्याची माहिती मिळाली. Chandrapur local news
सध्या वैभव कुठं आणि त्याचे मित्र कोण याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला असता, इंदिरानगर येथील 30 वर्षीय संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बरलेवार याला ताब्यात घेत विचारपूस केली, पोलिसांना तो तपासात सहकार्य करीत नव्हता, त्याचवेळी पोलिसांना वैभव हा रात्री मित्रांसोबत नाशिक ला जात असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तात्काळ वैभव डोंगरे व त्याचा साथीदार सिंदेवाही येथील 25 वर्षीय कार्तिक रमेश बावणे यांना ताब्यात घेत विचारपूस केली.
आरोपीनी राहुल ची हत्या केली असल्याची कबुली दिली, 14 जून ला सायंकाळी 7 ते 8 वाजता राहुल ला सोबत घेत ज्यूबली शाळेच्या आवारातील शासकीय पडक्या इमारतीच्या छतावर नेत दारू पाजली, दारूच्या नशेत असलेल्या राहुल चा गळा आवळत त्याच्या डोक्यावर दारूच्या बॉटल फोडल्या या हल्ल्यात राहुल चा जागीच मृत्यू झाला.
मृतदेहाचे हात पाय चिकटपट्टीने चिपकविण्यात आले.
आव्हानात्मक खुनाच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीनी 24 तासाच्या आत ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला.
सदर प्रकरणी आरोपी वैभव राजेश डोंगरे, कार्तिक रमेश बावणे व संदीप राजकुमार बरलेवार यांना कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
सदर यशस्वी कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र खनके, स्वामी चालेकर, संजय आतकुलवार, नितीन साळवे, सुभाष गोहोकार, गोपीनाथ नरोटे यांनी केली.
