चंद्रपूर - जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून वाहन चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सदर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचेकडे वर्ग केला.
बाळासाहेब खाडे यांनी विविध पथक तयार करीत, विशेष मोहीम राबवली यामध्ये 5 अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणात एकूण 15 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने वाहन चोरांना अटक केली यामध्ये पारधी गुडा तालुका कोरपना येथे राहणारे 24 वर्षीय प्रदीप संजय शेरकुरे, 30 वर्षीय विजय शंकर देवगडे, 29 वर्षीय राजेंद्र नानाजी काळे, देलनवाडी सिंदेवाही तालुक्यातील 27 वर्षीय रोशन अशोक गोबाडे, सावली तालुक्यातील 24 वर्षीय विपुल प्रभाकर मेश्राम यांचा समावेश आहे. Chandrapur police
आरोपिंची कसून चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन वरोरा, रामनगर, राजुरा, गडचांदुर, वणी जी.यवतमाळ येथील दुचाकी चोरीची बाब कबुल केली. Local crime branch
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी यांनी चोरी केलेल्या एकूण 15 दुचाकी जप्त केल्या, आरोपी व जप्त दुचाकी वाहन संबंधित पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आले आहे. The bike thife
पहिल्यांदाच स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील संघटित गुन्हेगारीवर चाप बसविला आहे. Lcb chandrapur
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि मंगेश भोयर, पोउपनी अतुल कावळे, राजेंद्र खनके, स्वामी चालेकर, संजय आतकुलवार, प्रशांत नागोसे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
