News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल नगर स्मार्ट सिटी म्हणून घोषित झालेल्या वॉर्ड नं. १२ मधे पहिल्याच पाऊसाने नाल्या साफ न केल्यामुळे छोटे तलाव बोडी सारखे पाण्याने डबके भरले असून डबक्यातील साचलेल्या पाण्यात गावठी डुकरे लोळत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून सभोवतालच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. काल परवा आलेल्या पहिल्याच पावसात जुन्या वस्तीमधील खुल्या जागेवरील डबके जलमय झाल्याने नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
Kingdom of dirt
Kingdom of dirt
पावसाळायापूर्वी नागरिकांना पावसातून कोणत्याही प्रकरच्या समस्या होऊ नये म्हणून उपाय योजना करणे नगरपरिशदेची नैतिक जबाबदारी असते. परंतु आतापर्यंत सत्तेवर असलेल्या न. प. पदाधिकाऱ्यांकडून याबाबत काहीही तोडगा काढण्यात न आल्याने आणि प्रशासनाने देखील दुर्लक्ष केल्याने आज ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. Watery in the first rain
पावसाळयात जुन्या वस्तीमधील नागरीकंाना दरवर्शी समस्यांना समोर जावे लागते.तसेच दुसरी समस्या शहरातील मुख्य मार्गावर आणि विश्रामगृह बांधकाम विभागासमोरील असलेल्या भूखंड क्रमांक 949 आणि 948,938,946,953 दरम्यान रस्त्यावर अवैद्य विटमातीचे कुंपण बांधकाम नगरपालिकेची कुठलीही परवानगी घेतली नसतांना बांधण्यात करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे. याबाबत वॉर्डातील नागरिकांनी नगरपालिकेकडे अनेक वर्षांपासून अवैद्यरीत्या केलेल्या अतिक्रमणाची तक्रार दाखल केली होती. The problem of encroachment
त्यानंतर नगर पालिकेने अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन थातूर मातूर कारवाई केल्याचा आरोप जुन्यावस्तीमधील नागरीकांनी केली आहे. Monsoon
परिणामी पहिल्याच पावसात जुन्या वस्तीमधील डबक्यात मोठया प्रमाणात पाणी जमा झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला. उर्वरित पूर्ण पावसाळा अजून बाकी आहे. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांची काय अवदशा होईल अशा प्रतिक्रीया जुन्या वस्तीतील नागरीकांनी केल्या आहेत.

