चंद्रपूर/भद्रावती - शहरातील प्रसिद्ध DNR ट्रॅव्हल्स या व्यावसायिक प्रवासी वाहतुकीदरम्यान आज सकाळी मोठी दुर्घटना होता होता टळली. Short circuit
सकाळी 7 वाजता चंद्रपूर वरून नागपूरला निघालेल्या DNR ट्रॅव्हल्स ही 7.30 वाजता भद्रावती येथे पोहचल्यावर अचानक ट्रॅव्हल्स च्या केबिन मधून धुव्वा निघायला लागला, हे बघताच वाहन चालकाने समयसूचकता दाखवीत ट्रॅव्हल्स थांबविली, प्रवाश्यांना खाली उतरवीत गाडीमध्ये आग पसरू नये यासाठी आग विझवायला सुरुवात केली.
प्रवाश्यांनी सुद्धा वाहन चालकाची मदत करीत मोठी दुर्घटना होण्याचे टाळले.
घटनेची माहिती होताच DNR व्यवस्थापकांनी तात्काळ दुसरी बस पाठवीत प्रवाश्यांना सुखरूप नागपूर ला पोहचविले.
