News 34 chandrapur
चंद्रपूर - पैश्यावरून सुरू झालेला वाद जीवावर बेतल्याची घटना आज चंद्रपुरातील मोरवा गावात घडली.मोरवा गावात राहणाऱ्या प्रवीण घिवे या युवकासोबत गावातील काही युवकांनी पैश्यावरून वाद घातला, त्यानंतर सदर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, युवकांनी मिळून प्रवीण ला मारहाण केली. Crime news
मात्र ते युवक इथवर थांबले नाही, त्यांनी प्रवीण च्या पाठीला दगड बांधत विहिरीत फेकून दिले, या घटनेत प्रविनचा मृत्यू झाला. Murder of a youth over a money dispute
घटनेची माहिती मिळताच पडोली पोलीस घटनास्थळी दाखल झाली, त्यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढत पंचनामा केला.
पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवली असता या खून प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. Chandrapur news
मृतक प्रवीण यांचेकडून मारेकरी युवकांनी काही पैसे उसने घेतले होते, ते पैसे परत मागायला गेलेल्या प्रवीण चा त्या मारेकऱ्यांनी काटाच काढला.
इतर आरोपींचा या प्रकरणी शोध सुरू आहे, पडोली पोलिसांच्या तत्परतेने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून पुढील तपास सुरू आहे.
