News 34 chandrapur
बल्लारपूर - शेतात वखरणी उरकल्यावर वाळलेली कपाशीची झाडे जाळतांना आग लागून शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील नांदगाव ( पोडे ) येथे आज दुपारच्या सुमारास घडली.सूधाकर पोडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. Sad news बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथिल शेतकरी सुधाकर उद्धव पोडे (५५) यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेतजमीन आहे.सध्या मान्सूनपूर्व शेतीची मशागत करण्याची लगबग सूरू आहे.आज बुधवारी सकाळी आठ वाजता सूमारास शेतात मशागत करण्यासाठी सुधाकर आणि त्यांच्या पत्नी बैलबंडीने शेतात गेले. Farmer burnt to death
सूधाकर पोडे यांनी शेतात नांगरणी केली.नांगरणीत गोळा झालेल्या कपाशीचे पुंजने तो जाळत होता. काठीने पुंजने जाळत असताना हवेच्या झोक्याने आगीचा लोळ त्याच्या अंगावर आला.
यात डोक्यापासून कंबरे पर्यंत सूधाकर पोडे जळाला.यात त्याचा शेतातच दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
