चंद्रपूर / मुंबई - मागील आठवड्यापासून सुरु असलेला राज्यातील सत्ता संघर्ष अखेर संपला, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, कांग्रेस व शिवसेनेने हातमिळवणी करीत महाविकास आघाडी स्थापन करीत मुख्यमंत्री पदी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. uddhav thackeray
१ वर्षाचा कालावधी जात नाही तोवर कोरोनामुळे राज्य अडचणीत आले, अनेक आव्हानाना सामोरे जात महाविकास आघाडी सरकारने न खचता नागरिकांची मदत केली. मात्र विरोधी पक्षातून सतत आमदार व मंत्र्यांविरोधात होत असलेल्या ED च्या कारवायांमुळे महाविकास आघाडीमधील मंत्री सहित आमदार हि घाबरले व राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणूक पार पडल्यावर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत ५० आमदारांना सोबत घेत महाविकास आघाडी व शिवसेनेविरोधात बंड उभारले.uddhav thackeray facebook live today
भाजपला पाठिंबा द्या व हिंदुत्वाच्या सोबत चला अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली मात्र उद्धव ठाकरे यांनी न डगमगता आम्ही शिवसेना पुन्हा उभी करू असा निश्चय केला. सदर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले ३० जून ला महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावे हा राज्यपालांचा आदेश कोर्टाने कायम ठेवत महाविकास आघाडीला धक्का दिला. uddhav thackeray news
बहुमत सिद्ध करण्या आधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज फेसबुकद्वारे नागरिकांशी संवाद साधत मनातील खंत व्यक्त केली, आम्ही लहान कार्यकर्त्यांना नगरसेवक ते आमदार व मंत्री असा प्रवास घडवून आणला मात्र आमच्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसला, ज्यांच्यावर मी डोळे बंद करून विश्वास केला त्यांनीच मला दगा दिला. मला राजकारणाचा खेळ खेळायचा नाही म्हणून मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.maharashtra floor test
शिवसेना पक्षाला ५६ वर्षे पूर्ण झाली, हातठेला, रिक्षावाले , टपरीवाले यांना शिवसेना पक्षाने मोठे स्थान दिले मात्र त्यांनी त्या मानाचा मान राखला नाही, मी शिवसैनिकांना सांगतोय, उद्या अजिबात मध्ये येऊ नका. जे काही व्हायचंय ते होऊद्या. त्यांचा गुलाल त्यांना उधळू द्या", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज राजीनामा दिल्यानंतर केलं. supreme court verdict on maharashtra floor test
"शिवसेनेला सत्तेतून खाली खेचलंत. शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन उतरवलं, त्यांचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि ज्यांना वाटायचेत त्यांना वाटू द्या", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

