News 34 chandrapur
चंद्रपूर - वर्ष 2014 ला राज्यात भाजपची सत्ता आल्यावर एका झटक्यात चंद्रपूर दारूबंदीचा निर्णय घेणारे तत्कालीन अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सत्तेत पुन्हा एन्ट्री करणार असल्याचे स्पष्ट होत असताना पुन्हा दारूबंदी होणार का अशी धाकधूक दारू विक्रेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. Sudhir mungantiwarवर्ष 2019 ला राज्यात राष्ट्रवादी, कांग्रेस व शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली, मात्र 2022 ला शिवसेनेच्या आमदारांनी पक्ष फोडत आपला वेगळा गट स्थापन करीत भाजपसोबत जाणार असे संकेत दिल्याने, मुख्यमंत्री ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. Liquor ban
आता भाजप पुन्हा सत्तेत येणार हे चित्र दिसत असल्याने अनेक नाखूष तर अनेक आनंदी झाले आहे.
मात्र चंद्रपुरातील दारूविक्रेते यावर काही प्रमाणात नाराज झाले आहे, जिल्हा पुन्हा दारूबंदी होणार काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी 7 वर्षांनी उठविण्यात आली, या कालावधीत जिल्ह्यात नियमबाह्य दारू दुकानाचे वाटप करण्यात आले, मागेल त्याला बार असे धोरण राबविण्यात आले होते. Mahavikas aghadi government
आजही अनेक ठिकाणी नियमबाह्य दारू दुकाने सुरू आहे, यावर जनविकास सेनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुखांनी आवाज उचलला आहे, आंदोलने केली मात्र प्रशासनाने कारवाई न करण्याची भूमिका घेतली. देशमुख यांचेकडे असलेली भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी नव्या पालकमंत्र्याकडे देणार काय? ती यादी खिश्यातच राहणार.
आता सरकार बदलणार हे समजताच नियमबाह्य दारू दुकानावर कारवाई होणार असा धाक दारू विक्रेत्यांना झालाय.
जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यावर सुधीर मुनगंटीवार ह्या नियमबाह्य कामावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ते पुन्हा येणार असे समजल्यावर चंद्रपुरात विविध चर्चा रंगल्या आहे.

