News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शाळेचा पहिला दिवस ' प्रवेशोत्सव ' म्हणुन साजरा करण्यात आला. आयुक्त राजेश मोहीते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले शाळेतील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून उत्साही व आनंदी वातावरणात त्यांच्या शालेय जीवनाची सुरवात झाली. Chandrapur municipal corporation
1st day of school
1st day of school
शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी २९ जुन पासुन विद्यार्थी शाळेत येत आहे. हा दिवस प्रवेशोत्सव म्हणुन साजरा करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहे. चंद्रपूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत व्हावा, त्यांना शाळेचा पहिला दिवस नाविन्यपूर्ण वाटावा यासाठी महानगरपालिकेच्या २९ शाळांमध्ये पालक, शिक्षक व मनपा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. (Education)
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक, गणवेश, शैक्षणिक साहित्य, फुल, पेढे आणि पोषण आहारामधून खाऊ वाटप करून हा उत्सव साजरा करण्यात आला.


