चंद्रपूर - 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त चंद्रपुरातील पोलीस फुटबॉल मैदानावर योग नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूर, पोलीस दल, आरोग्य भारती, महावीर इंटरनॅशनल व अखिल भारतीय योग शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
चंद्रपुरात योग नृत्य परिवारातर्फे विविध ठिकाणी नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी केंद्र सुरू केले असून नागरिकांचा या केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत आहे. World yoga day 2022
21 जून ला सकाळी 6 वाजता पोलीस फुटबॉल मैदानावर आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, प्रभारी पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, गृह उपअधीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सुधाकर आंभोरे, राजेश मुळे, स्वप्नील धुळे, संदीप एकाडे, सुमित परतेती, महावीर इंटरनॅशनल चे फेनबाबु भंडारी, उमेश चांडक उपस्थित राहणार आहे. Yoga dance family
आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन योग नृत्य परिवार ट्रस्ट चे अध्यक्ष गोपाल मुंदडा यांनी केले आहे.