चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हयात अनेक ग्राम पंचायत क्षेत्रात पथदिव्यांचे विज कनेक्शन थकित विजबिलापोटी खंडीत केले जात आहेत. हा जिल्हा विज उत्पादक जिल्हा आहे. अनेक ग्राम पंचायती या वनव्याप्त क्षेत्रात आहे.
जंगली श्वापदांचे हल्ले सातत्याने होत आहेत. जिल्हयातील ११ तालुके मानवविकास निर्देशांकात मागे आहे. अशा परिस्थीतीत थकित विज बिलापोटी पथदिव्यांचे विज कनेक्शन कापणे ही बाब अन्यायकारक आहे. ही मोहीम त्वरीत थांबविण्यात यावी, अन्यथा आम्हाला आंदोलनासाठी रस्त्यावर यावे लागेल, असा ईशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. Sudhir mungantiwar
Exhausted electricity bill
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक १८ जून २०२२ रोजी विश्रामगृह चंद्रपूर येथे महावितरणच्या अधिका-यांसह बैठक घेत आढावा घेतला. या बैठकीला मुख्य अभियंता श्री. देशपांडे, अधिक्षक अभियंता श्रीमती चिवंडे, कार्यकारी अभियंता महेश तेलंग, सुहास पडोळे, उपअभियंता यांच्यासह भाजपा नेते रामपाल सिंह, नामदेव डाहूले, राजीव गोलीवार, श्रीनिवास जंगमवार, राकेश गौरकार, सुभाष गौरकार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हयातील किती ग्राम पंचायतींचे पथदिव्यांचे विज कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे, bjp chandrapur थकित विज बिलापोटी किती रक्कम शिल्लक आहे, याआधी पथदिव्यांच्या विजबिलाचा भरणा कोण करायचे अशी विचारणा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. Chandrapur local news पथदिव्यांच्या विजबिलाचा भरणा सरकार करेल असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी विधानसभागृहात दिले आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ़ यांच्याशी दुरध्वनी द्वारे चर्चा केली असता त्यांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.