News 34 chandrapur
चंद्रपूर - काही वर्षांपूर्वी आकाशातून वीज पडण्याच्या घटना ग्रामीण भागातुन ऐकिवात होत्या. परंतु, वातावरणातील बदलामुळे शहरीभागातही वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
याचा अनुभव पुन्हा एकदा चंद्रपूरवासीयांना आला.शुक्रवारी 17 जूनला रात्रौ 8.15 च्या सुमारास पावसाने हजेरी लावली आणि सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्या जवळील एका ताडाच्या उंच झाडाला विजेने कवेत घेतले. आणि ओले झाड पेटू लागले.नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. विशेष मागील वर्षी तुरळक पाऊस पडत असतांना महसूल भवनावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला होता. lightning
वीज पडण्याचे प्रमाण वाढतच जाणार
पूर्वी मान्सूनचे Monsoon आगमन होताच पावसाचे संथ गतीने आगमन होत होते.आता मात्र तापमानातील बदलामुळे वादळीस्थिती निर्माण होत आहे.उष्णता वाढण्याचे हे परिमाण आहेत.नागरिकांनी ढगांचा गडगडाड व वीज चमकताना घराबाहेर पडू नये.घरांवर इलेक्ट्रिक अरेस्टर Electric Arrester लावावे.
सुरेश चोपणे
ग्रीन प्लॅनेट सोसायटी
चंद्रपुर.
घटना उशिरा कळली
वीज पडली तेव्हा मी घरी न्हवतो.घरापासून किमान 50 फुटावर ही घटना घडली.पण लगेच अग्निशामकास पाचारण करण्यात आले.घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच आग विझविण्यात आली. नागरिकांनी सतर्क रहावे.विजा कडाडतांना झाडाखाली उभे राहू नये.
अजय गुल्हाणे
जिल्हाधिकारी,चंद्रपूर.