News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मूल :- पुढील दिडशे वर्षासाठी प्रस्तावित असलेल्या रेल्वेस्टेशन व विद्यार्थ्यांच्या खेळाचे ग्राउंड लगत होत असलेला मालधक्का हा मानवाला आणि वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण करणारा असल्याने याठिकाणी कुठलीही रेल्वे वाहतूक होत असून केवळ (डंपिंग यार्ड) केले जात आहे. Maldhakka
पर्यावरणात ध्वनी व वायु प्रदूषण यात केवळ प्रदूषण युक्त कच्यामालाची नेआण मोठ्या प्रमाणात होऊन होणाऱ्या कच्या लोहांमधे (iron fist cast) मिसळलेले कार्बन, मग्निज, फॉस्फरस, गंधक, सिलिकॉन, कार्बन मोनाकाईड शुद्ध नैसर्गिक वातावरणामध्ये मिसळून श्वसन क्रिया होण्यास आक्सिजन प्राणवायूची oxygen मात्रा कमी होऊन याचा विपरीत परिणाम मानवाच्या व वन्यप्राण्यांच्या आरोग्याला धोकादायक असल्याने मुल शहरातील मालधक्का (डंपिंग यार्ड) दूरवर मुल शहराच्या बाहेर स्थलांतरित करावे आणि मुल वासी जनतेचे व वन्यप्राण्यांचे आरोग्य अबाधित राखावे अशी मागणी मूलच्या मर्निंग ग्रुपने शहर वासियांच्या हितासाठी केली असून या मागणीला मुल नगरातील समस्त व्यापारी बांधवांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यानी लोकहितासाठी असल्याने सर्व मिळून रेटून धरु अशी ग्वाही दिली असल्याने जर मालधक्का मुल नगराचा बाहेर स्तलंतर केल्यागेला नाही तर जनआंदोलन करण्यात येईल असाही इशारा morning ग्रुपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या मध्मातून दिला आहे.
यासंदर्भात सुज्ञ असलेल्या व लोकहितासाठी झटणाऱ्या morning ग्रुपच्या सदस्यांनी माल धक्याचे काम सुरु झाल्याबरोबर तात्काळ नागपूर येथील रेल्वेचे प्रबंधक मलिंद्र उप्पल यांना प्रत्यक्ष भेटून मुल नगरातील मालधक्का मानवाच्या व वन्यप्राण्यांच्या आरोग्याला धोका पोहचविणारे असल्याने तो मूलच्या बाहेर स्तलांतर करावे असे निवेदन दिले.
मुल शहरात एकमेव असलेल्या कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगनावर शेकडोविद्यार्थी, विद्यार्थिनी व्हॉलीबॉल, क्रिकेट,फुटबॉल, रानिंग, उंचऊडी, लांबउडी, कबड्डी, असे अनेक खेळ खेळतात तसेच नगरातील ज्येष्ठ नागरिकांचे देखील हे ग्राऊड एकमेव फिरण्याचे ठिकाण आहे. आणि अशा ठिकाणी मालधक्का झाल्यास असंख्य विद्यार्थ्यांचे व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे .तसेच ग्राऊंडच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला लागूनच बगर झोन असल्याने या बफर मधे tiger,अस्वल, बिबट, हरीण, रानगवे, मोर, चितळ अशा अनेक वण्यप्राण्यांचे wild animals फिरण्याचे ठिकाण आहे. म्हणूनच पर्यावरणाचा समतोल राखल्या जात आहे. असे असतांनाही माल धक्का तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याठिकाणी पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने पूर्वीचं वनविभागाने शेकडो सागवन झाडे लावून त्यांना मोठी केली आहे. आज तीस फूट उंचीचे झाडे उभे असताना मालधक्याचे काम सुरु करणाऱ्या लाईट मेटल कंपनीने वनविभागाची व पर्यावरण विभागाची कुठलीही परवानगी न घेताच रस्ता करण्यासाठी सर्व्ह नंबर २१६ मधील १८ ते २० झाडं अनधिकृत तोडली व झाडे तोडलेली दिसू नये म्हणून त्यावर मुरुम टाकून बुजविले आहे. याबाबतची प्रत्यक्ष पाहणी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेलमे यांनी भारतीय वनअधिनियम १९७२ अन्वये सदरहू कंपनीवर वन गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक निकिता चौरे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेलमे, क्षेत्रसहायक एम. जे.म्हस्के, वनरक्षक सुभाष मरस्कोल्हे यांनी केली असून तोडलेली झाडे जप्त केली आहे. हे काम सुरु झाल्याची माहिती न. प.प्रशासनाला सुध्धा दिलेली नाही. Rail freight transport
रेल्वेने मालधक्का निर्माण केल्यास पूर्व व उत्तर दिशेला लागूनच लोकवस्ती असल्याने कच्चा लोखंडामध्ये मिसळलेले कार्बन, मॅग्नीज, फॉस्फरस, गंधक, सिलीकॉन आदी रासायनिक पदार्थांमुळे शुध्द वातावरणात कार्बन मोनाक्साइड मिसळून श्वसनासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची मात्रा कमी होऊ शकते. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सदर परिसरात फिरणे आणि खेळण्यास जाणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे होऊ शकते. ज्या परिसरात मालधक्का निर्माण केला जात आहे, त्या परिसरात लहान मुलांचे कॉन्व्हेंट आहे. त्यामुळे त्यांच्याही जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून लागूनच बफर झोनचे जंगल आहे. जंगलात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे. या परिसरात मालधक्का निर्माण झाल्यास वन्यप्राण्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो.
व्यावसायिकदृष्ट्या प्रगतीपथावर असलेल्या मूल शहरातून सध्यस्थितीत राज्य व आंतरराज्यीय वाहतुकीसोबतच अंतर्गत वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीच्या असलेल्या मूल शहरात मालधक्क्याच्या माध्यमातून पुन्हा वाहतूक वाढल्यास त्याचा त्रास विद्यार्थ्यांसह सर्व सामान्य नागरिकांनाही होऊ शकते. ज्या परिसरात मालधक्का निर्माण केल्या जात आहे त्याच परिसरात रेल्वे फाटक आहे. सध्या सुरू असलेल्या रेल्वेच्या येण्या-जाण्यात सदर फाटक बंद झाल्यास वाहतूक खोळंबून राहते. अश्या परिस्थितीत या परिसरात मालधक्का निर्माण झाल्यास मालधक्क्यामधून चालणाऱ्या वाहतुकीमुळे वारंवार रेल्वे फाटक बंद करावी लागणार असून याचा त्रास वाहनांसोबतच नागरिकांनाही होणार आहे. त्यामुळे सदर परिसरात रेल्वे मालधक्का निर्माण न करता हा परिसर नागरिकांच्या आरोग्यासाठी अबाधित ठेवण्यासाठी मालधक्क्याची निर्मिती शहराबाहेर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदन माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी, खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हाधिकारी यांनाही दिले आहे. पत्रकार परिषदेला प्रतिष्ठित व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक हिरेन गोगरी, माजी संचालक जीवन कोतमवार, दिनेश गोयल, अमोल बच्चूवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, माजी सभापती चंदू मारगोनवार, माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, प्रशांत समर्थ, आश्विन पोलिकर, सचिन चिंतावार, नितीन येरोजवार, रुपेश माररकवार, राहुल बोमनवार, किशोर गोगुलवार, सजय भुसारी, सुरेश फुलझेले, संजय येरोजवार, संतोष पलांदुरकर, विजय सिद्धवार, केशवाणी, उधवाणी,आदींसह मरणींग ग्रुपचे अनेक सदस्य व नागरिक उपस्थित होते.