News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - कोसंबी ग्रामपंचायत च्या वतीने स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५/६/२०२२ रोजी शनिवार ला स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार प्राप्त मौजा कोसंबी येथे, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. Blood donationयाप्रसंगी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित देव घुनावत, गट विकास अधिकारी पंचायत समिती मुल, धनंजय साळवे गट विकास अधिकारी पंचायत समिती गोंडपिपरी, रविंद्र किसन कामडी सरपंच ग्रामपंचायत कोसंबी, जिवन प्रधान विस्तार अधिकारी (पंचायत) पंचायत समिती मुल, डॉ.पवार, गावित,पचारे,रक्त संक्रमण पेढी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर, देवानंद पाटील गावंडे सावरगाव, या रक्तदान शिबीरामध्ये कोसंबी वासीय जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी २५ युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत कोसंबीचे पुरस्कार प्राप्त होतकरु सुशिक्षित उत्साही सरपंच रवींद्र किसन कामडी यांनी प्रास्ताविक भाषणात रक्तदान विषयी सखोल माहिती दिली. तसेच ग्रा.पं सचिव सुरज प्रकाश आकनपल्लीवार, उपसरपंच, सारिका ईश्वर गेडाम, चंदाताई विनोद कामडी, अरुणा रामदास वाढई, मनिष चौधरी तसेच ग्रा.पं. सर्व सन्माननीय सदस्य गण, सावित्रीबाई फुले वाचनालय कोसंबी चे अध्यक्ष, सचिव, आणि सर्व सन्माननीय सदस्य गण, महाकाली महिला ग्रामसंघ कोसंबी, सर्व महीला बचत गट, सर्व पुरुष बचत गट,पशु सखी,आशा वर्कर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सर्व महिला मंडळ, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष महाराज गुरनुले आणि कार्यकर्ते, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती, जि.प. उच्च प्राथमिक शाळा शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी , पालक, ग्राम पंचायत कमेटी, सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय कोसंबी, नवयुवक व्यायामशाळा, आंगनवाड़ी सेविका, आंगनवाड़ी मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, कृषी मित्र, संगणक परिचारक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक मंडळ, युवती मंडळ, आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि.प.उच्च प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक गटलेवार यांनी केले आणि या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सुरज आकनपल्लीवार ग्रामसेवक ग्रामपंचायत कोसंबी यांनी मानले.