News 34 chandrapur
(गुरू गुरनुले)
मुल - चामोर्शी ते नागपूर खाजगी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 3 जण गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मूल-चामोर्शी मार्गावरील योग राईस मिल rice mill जवळ सकाळी 7 वाजुन 30 मिनिट दरम्यान घडली.
तालुक्यातुन मोठया प्रमाणावर खाजगी प्रवासी वाहतुक होत आहे, दरम्यान चामोर्शी वरुन मूल मार्गे नागपूर खाजगी प्रवासी वाहतुक करीत असलेल्या श्री. बाबा ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 14 सी डब्लु 1982 च्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर अपघात मूल जवळुन 5 किमी अंतरावर झालेला आहे.
Baba travels
सदर ट्रॅव्हल्स चामोर्शी येथील शेट्टे यांची असुन
सदर वाहनमधून 12 प्रवासी वाहतूक करीत असल्याचे बोलले जाते, त्यापैकी 3 जण गंभीर जखमी झाले. नागरीक आणि मूल पोलीस जखमीना मूल उपजिल्हा रुग्णालयात पोहचविण्यासाठी मदत करीत आहे. Road accident