News 34 chandrapur
चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी ४७७ कोटी ३१ लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.
चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन २४ कोटी ८९ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ५ कोटी ९२ लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन ६ कोटी ५१ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून २ कोटी ५१ लाख तर ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्याकडून २१५ कोटी ६९ लाख येणे आहेत. Electricity bill recovery
चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन २४ कोटी ८९ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ५ कोटी ९२ लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन ६ कोटी ५१ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून २ कोटी ५१ लाख तर ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्याकडून २१५ कोटी ६९ लाख येणे आहेत. Electricity bill recovery
नोटीशीची मुदतही संपल्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच आता water supply पाणीपुरवठा योजना, पथदिवे, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभरात या सर्व वर्गवारीतील थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची मोहिम सुरु असून या मार्च-२२ पासून आतापर्यंत चंद्रपूर परिमंडळात ६ हजार ५८२ थकबाकीदरांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. Msedcl maharashtra
विशेष म्हणजे दिवसेंदिवस वीजेचा वापर वाढतच आहे. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून वसुल केलेल्या पैशातूनच वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत वीजखरेदी करून वीजपुरवठा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. वीजबिल वसूलीतून प्राप्त पैशामधून ८५ टक्के रककम वीजखरेदीवर केली जाते. महावितरण प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते. या उलट अनेक सेवासांठी आधी पैसे व नंतर सेवा असे असते. तरी पण वीजकंपनीच्या अभियंता कर्मचारी वर्गास मारहान, अपमान सहन करून ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरण अपेक्षित असतांना वसुलीसाठी त्यांच्या दारी जावे लागत आहे. वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण वीज निर्मिती कंपण्याकडून वीजखरेदी करते व वसुल झालेल्या पैशातूनच वीज खरेदी करत असते. वीज निर्मिती कंपन्या कोळसा, नैसर्गिक तेल वीजनिर्मितीसाठी Natural oil खरेदी करतात व त्यापण कोळसा व तेल कंपण्यांना पैसे देणे लागतात. परंतु वसुलीच झाली नाही तर हे चक्र पूर्णपणे कोलमडणार.
महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.