चंद्रपूर - सध्या राज्याच्या राजकारणात हाहाकार सुरु आहे, शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढत राजकारणात नवे वादंग निर्माण केले आहे.
I support uddhav thackeray
I support uddhav thackeray
अश्यातच शिंदे गटाने आम्हीचं खरे शिवसैनिक असल्याचे म्हटले आहे. Politics news
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसैनिक कोण व शिंदे गटातील कोण हे ओळखणे कठीण झाले असले तरी त्यांनी पक्षांतर्गत बैठका सुरू करीत पक्षाला नवी भरारी देण्याचे काम करीत आहे.
अश्यातच चंद्रपूर जिल्हा शिवसेनेने 28 जूनला शासकीय विश्रामगृहात बैठक घेत आमचा पक्ष शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात भूमिका घेतली. Shivsena news
या बैठकीला जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे, जिल्हा महिला संघटिका उज्वला नलगे, शहर प्रमुख प्रमोद पाटील, माजी नगरसेवक सुरेश पचारे, निलेश बेलखेडे, अब्दुल वसीम आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


