News 34 chandrapur
घुग्घुस - दिक्षा भुमी घुग्घुस येथील पाठीमागे मे. चिअर्स प्रा. लि. अंतर्गत जश्न देशी बार सीएल् अनुज्ञप्ती उल्हासनगर जिल्हा ठाणे येथुन मौजा घुग्घुस येथील श्रीमती लक्ष्मी नेहरू लालवानी यांचे मालकिचे सर्व्हे नं. 15/5 प्लाट नं. 204/2/55 येथील बांधकाम केलेल्या इमारतीत स्थलांतर करून सुरू करण्या करीता परवानगी तात्काळ रद्द करण्याबाबत निवेदन भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी उत्पादन शुल्क अधिक्षक साहेब यांना दिले.
वॉर्ड क्रमांक 3 आताचा प्रभाग क्रमांक 7 येथील पं. पु. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेल्या आहे. सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सांगितले की बौद्ध बांधव व घुग्घुस येथील सर्व धर्मातील जनता हजारोंच्या संख्येने या स्थळी बाबासाहेबांना मान वंदना अभिवादन करण्यासाठी एकत्रित होतात. Liqur shop
याच स्थळी प्रौढ व्यक्तींना सकाळी व सायंकाळी व्यायाम करण्साठी लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा सुध्दा उभारण्यात आलेल्या आहे.
घुग्घुस येथील बौद्ध बांधव व घुग्घुस येथील नागरिक त्या स्थळाला दिक्षा भुमी म्हणून संबोधले आहे.
Dikshabhoomi
उल्हासनगर जिल्हा ठाणे येथील व्यक्ती नामे विलास भिकाजी टेंभुर्णे संचालक मे. चिअर्स प्रा. लि. तिथुन जिल्हा स्थलांतर करून घुग्घुस येथे दिक्षा भुमी पाठिमागे देशी दारू दारुच्या दुकानाचीपरवानगी मागितली आहे.
नगर परिषद घुग्घुस येथील ठराव क्रमांक 5 दिनांक 15/11/2021 व नगर परिषद घुग्घुस यांनी दिनांक 25/11/2021 पत्र मंजूर करून त्यांना परवानगी देण्यात म्हणजे फक्त 10 दिवसात हा निर्णय या मुख्याधिकारी यांनी केला दिला असे अधिकारी येऊन आमचा घुग्घुस येथील शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करतात. या मंजुरीने घुग्घुस येथील बौद्ध बांधव व नागरिकांना खुप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.
जेव्हा की घुग्घुस येथे आद्याप एक ते दीड वर्षापासून निवडणूक झाली नाही व नगर परिषद घुग्घुस येथे कोणतेही नगराध्यक्ष किंवा नगर सेवक नाही आणि हा गलिच्छ ठराव नगर परिषद घुग्घुस मुख्याधिकारी यांनी साठगाठ करून दिला आहे असा अधिकार्यांवरती कडक चौकशी करून सक्त कारवाई करुन निलंबित करण्यात यावे व तेथील परवानगी रद्द करण्यात यावी. अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे निवेदन सादर करताना भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी इशारा दिला यावेळेस आशिष परेकर, ललित गाताडे, सिध्दार्थ गुडदे, मंजुनाथ मडावी, अंकित नालमवार उपस्थित होते.