News 34 chandrapur
चंद्रपूर - मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्ता नाट्याचे पडसाद चंद्रपुरात सुद्धा दिसू लागले आहे. Maharashtra political dramaशिवसेनेतून बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांनी नवा गट स्थापन करीत 50 आमदारांना गुवाहाटी मध्ये नेले, जो मंत्री बंडखोरांची मनधरणी करायला जात आहे तो शिंदे गटात सामील होत आहे. Rebal eknath shinde
मात्र या सर्व नाट्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकटे पडले आहे, मात्र राष्ट्रीय कार्यकारणी मधील पदाधिकारी सदस्यांनी आपण शिवसेना पुन्हा उभी करू असा निर्धार केला आहे. Political news
सध्या शिवसेना सर्व परिस्थिती शी सामना करण्याची मोर्चे बांधणी करीत आहे. Shivsena news
शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला असून कोणत्याही क्षणी सरकार कोसळणार असून त्यासाठी महाविकास आघाडीला मधील घटक पक्षाला फ्लोर टेस्ट साठी सामोरे जावे लागणार आहे. Maharashtra politics
या सर्व राजकीय नाट्याचे पडसाद आज कामगार सेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसले, तुकुम परिसरात बंडू हजारे व कैलास तेलतुंबडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत एकत्र येत एकनाथ शिंदे यांचं पोस्टर जाळलं. Guwahati
शिवसेनेला कितीही तोडलं तरी ते पुन्हा मजबूत होणार यासाठी तळागाळातील शिवसैनिक पुन्हा उभा राहणार असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी केला आहे.