News 34 chandrapur
बल्लारपुर - दिनांक 27/06/2022 रोज आम आदमी पक्षाने बल्लारपूर नगर परिषदेमध्ये होत असलेले निवडणुकीकरिता प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर आक्षेप घेतलेले आहे. त्या आक्षेपाचे निवेदन पार्टीतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, माननीय निवडणूक अधिकारी साहेब बल्लारपूर तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालय बल्लारपूर यांना लेखी कळविले आहे. Voter list
Aam Aadmi party
Aam Aadmi party
आम आदमी पक्षानुसार प्रभाग यादीमध्ये छापील यादीत एकाच कुटुंबाचे सदस्यांचे नावे अर्धे-अर्धे नोंद आहे. प्रभाग निहाय यादी मध्ये प्रभाग रचना अन्वय तसेच नागरिकांचे वास्तव्य प्रमाणे नोंद नसून त्रुटी पूर्ण आहे, वार्ड आणि प्रभागा प्रमाणे असलेली जुनी यादीत जे लोक हयात नाही त्यांची नावे यादी समाविष्ट आहे. Division formation
काही प्रभागातील घरांची संपूर्ण रांगच मतदार यादी मध्ये नमूद नाही, आपल्या तहसील कार्यालयामार्फत नियुक्त केलेले B.L.O नी तैयार केलेले यादीत आधार कार्ड वर दिलेल्या पत्ता त्याप्रमाणे यादी तैयार करण्याचे निर्देश असताना त्या नियमांचे पालन करण्यात आलेले नसून त्रुटी पूर्ण यादी तयार करण्यात आलेली आहे, तसेच राजकीय पक्षाला ऑनलाईन अन्वये बल्लारपूर शहरातील सर्व प्रभागांची मतदार यादी च्या अभिलेख पुरविण्याचे दिशानिर्देश असताना त्या कामाचे व्यवसायीकरण करण्याचे हेतूने ती यादी देण्यास संबंधित अधिकारी नाकारत आहे. Objection to the voter list
सदर प्रभागाच्या यादी मधील प्रभाग रचनेचा उल्लेख केल्याप्रमाणे लोकांचे नाव नोंद बरोबर घेण्यात आली नाही, तसेच संबंधित अधिकारी व मदत केंद्र स्थापित करून लोकांचे व राजनितिक पार्टीचे आक्षेप रीतसर नोंदविण्यात यावे.
इत्यादी मागणी पक्षातर्फे आक्षेप घेऊन निवेदना मार्फत देण्यात आली. उपरोक्त सर्व तफावत व दुरुस्ती केल्याशिवाय लोकांचे संविधानिक अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्याचा कृत्य होणार, निवडणूक म्हणजे आपल्या राज्याचा आणि देशाचा लोकतंत्र स्थापित करण्याचा मुख्य उद्देश होय अशी असताना आपल्या कार्यालयातून होणारी त्रुटी पूर्ण कृत्य असंविधानिक आहे. Objection to ward structure
या आशयाची मागणी करत आम आदमी पक्षातर्फे आक्षेप नोंदविण्यात आला व कार्यालया मार्फत झालेल्या त्रुटी त्यांच्या लक्षात आणून दिल्या व त्रुटी दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुकीचे कार्य पुढे सुरू करू नये व ते तात्काळ थांबविण्याची मागणी पक्षातर्फे करण्यात आली. सदर आक्षेपाचे निवेदन देत असताना आम आदमी पक्षाचे जिल्हा संयोजक सुनील मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, बल्लारपूर चे संयोजक रविकुमार पप्पूलवार, सहसंयोजक अफजल अली, मीडिया प्रभारी सागर कांमळे, प्रा. नागेश्वर गंडलेवार, गणेश सीलगमवार आणि इत्यादी उपस्थित होते.