News 34 chandrapur
चंद्रपूर - देशातील तरूण सैन्यात भरती होण्याकरीता वर्षानुवर्षे तयारी करतो. कुठल्याही वशिल्याविना सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी - शेतमजुराचे मुलाला रोजगार देणा-या या क्षेत्रात आता केवळ 4 वर्षांकरीता कंत्राटी पध्दतीप्रमाणे भरती करणारी अग्नीपथ योजना agneepath scheme केंद्रातील भाजपचे मोदी सरकारने आणून तरूणांची थट्टा केलेली असुन यामुळे देशभरात युवकांमध्ये तिव्र संतापाची लाट उसळलेली आहे.
4 वर्षाची सेवा संपल्यानंतर या युवकांना पेंशन देखील मिळणार नसुन अत्यल्प आर्थिक मोबदला दिल्या जाणार आहे. निवृत्ती नंतर तरूणांचे भविष्य अंधकःरमय होणार असल्यामुळे हि योजना त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी काॅंग्रेसच्या ओबीसी विभागाचे वतीने करण्यात आली. agnipath scheme protest
4 वर्षाची सेवा संपल्यानंतर या युवकांना पेंशन देखील मिळणार नसुन अत्यल्प आर्थिक मोबदला दिल्या जाणार आहे. निवृत्ती नंतर तरूणांचे भविष्य अंधकःरमय होणार असल्यामुळे हि योजना त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी काॅंग्रेसच्या ओबीसी विभागाचे वतीने करण्यात आली. agnipath scheme protest
याबाबतचे निवेदन प्रदेश काॅंग्रेसच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत धांडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी षहर काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल ताजणे, खुशाल लोडे, यशवंत नक्कावार, अनिल बद्यलवार, महेंद्र कुनघाडकर, दिपक पाटील वाढई, मिनाक्षी गुजरकर, कविता वैरागडे, सुलभा जक्कुलवार, लता बारापात्रे, संजय उमरे, गजानन सुर्तीकर, आशिष वांढरे यांची उपस्थिती होती. about agnipath scheme
तत्पुर्वी झालेल्या बैठकीत ना. उध्दव ठाकरे यांचे नेतृत्वात काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्र्वादी काॅंग्रेसचे राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीचे सरकार विरूध्द कुरघोडी करून अस्थैर्य निर्माण करणा-या भाजपाचा निषेध करण्यात आला. देशाचे संसदेत आणि संसदे बाहेर केंद्रातील मोदी सरकारला देशहिताचे प्रश्न विचारणारे काॅंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांना इडीचे माध्यमातुन विनाकारण चैकशीचा ससेमिरा लावणा-या कृतीचाही या बैठकीत निषेध करण्यात आला.
Obc cell congress
Obc cell congress
काॅंगे्रस पक्षाचे माध्यमातुन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार आणि खा. बाळुभाऊ धानोरकर यांचे नेतृत्वात जिल्हयात लोकहिताचे प्रश्नावरून रस्त्यावर उतरून पुढील काळात तीव्र संघर्ष करू असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला.


