News 34 chandrapur
चंद्रपूर - राजर्षी शाहू महाराज कोण होते? हे माहीत आहे काय आपल्याला?आजची तरुण पिढी त्यांना केवळ नावाने ओळखते. त्यांची कार्ये त्यांनी मांडलेले विचार याची त्यांना म्हणावी तितकी माहिती नाही. माहिती ती कशी असणार ? आजचा तरुण व्हाट्सअप्प फेसबूकवर फक्त महाराजांचा फोटो Dp म्हणून ठेवण्यात व्यस्त आहे, एक दिवस स्टेटस ठेवले किंवा फेसबुक वर एखादी पोस्ट शेअर केली. की झाली जयंती असे मानणाऱ्या तरुणाला त्यांचे चरित्र वाचायला वेळ आहे तरी कोठे ?
rajarshi shahu maharaj jayanti
rajarshi shahu maharaj jayanti
इतिहासात समाजक्रांतीचा झेंडा राजाच्या खांद्यावर क्वचितच दिसून येतो. समाजसुधारक राजे अनेक होऊन गेले, परंतु समाजक्रांतिकारक राते शोधूनही सापडणे कठीण. असा दुर्मिळ राजे होण्याइतके कार्य शाहू महाराजांकडून घडले म्हणून त्यांचे नाव आजही सर्वांच्या स्मरणात राहिले आहे.
बहुजनांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणं यासारख्या असंख्य गोष्टी छत्रपती शाहू महाराजांनी केल्या. वयाच्या २० व्या वर्षी ते कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक सुधारणा घडवल्या. British monarchy
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी लढणारे, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपुरातील बहुजन मेडिकोज असोसिएशन तर्फे 3 जुलै ला शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात भव्य कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आयोजित कार्यक्रमात उदघाटक म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, महाराष्ट्र शासनातील उद्योग विभागाचे मुख्य आयुक्त हर्षदीप कांबळे, प्रसिद्ध शिव चरित्रकार श्रीमंत कोकाटे, शाहू महाराजांवरील जीवन कार्य व विचारांवर PHD डॉ. सिद्धार्थ, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व परिवर्तनवादी कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, डॉ. वासुदेव गाडेगोने, दादा वासनिक, राजू ताटेवार, संजय घाटे, चेतन खुटेमाटे, पी.एम. सातपुते, भुपेंद्र लोढिया हे उपस्थित राहणार आहे.
सदर कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांचे विचार, त्यांच्या समाजपयोगी आयुष्यावर प्रकाश टाकण्यात येणार असून आपल्याला शाहू महाराज कोण होते? हे या कार्यक्रमात सर्वाना कळेल.
अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी पत्रकार परिषदे द्वारे दिली असून या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.

